Jaydeep Apte : राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. जयदीप आपटे ( Jaydeep Apte ) २६ ऑगस्टपासून म्हणजेच पुतळा पडल्याच्या दिवसापासून जयदीप आपटे फरार होता. जयदीप आपटे ४ सप्टेंबरला अटक झाली आहे.

जयदीप आपटेच्या मागावर होती सात पथकं

जयदीप आपटेला शोधण्यासाठी मालवण पोलीस, ठाणे पोलीस आणि कल्याण ग्रामीण पोलिसांची सात पथकं कसून शोध घेत होती. मात्र, जयदीप आपटे त्यांच्या हाती लागला नव्हता. अखेर बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटे ( Jaydeep Apte ) स्वत:च कल्याणमधील त्याच्या घरी आला आणि अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडला. तो जेव्हा तावडीत सापडला तेव्हा तो गयावया करु लागला. रडू लागला अशी माहिती आता समोर येते आहे.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
shrikant shinde maharashtra assembly election 2024
Shrikant Shinde in Sangli: श्रीकांत शिंदेंकडून युतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा? खानापूरबाबत जाहीर कार्यक्रमात म्हणाले…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यापासून फरार होता जयदीप आपटे

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. दुपारी १ वाजून १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शी तर हळहळलेच. मात्र पुतळा पडल्याचे जे फोटो आणि व्हिडीओ समोर आले त्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत आहेत. त्यांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवभक्त अतिशय नाराज झाले. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागितली. तर विरोधकांनी या घटनेचा निषेध नोंदवला. यानंतर शिल्पकार जयदीप आपटे ( Jaydeep Apte ) कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित झाला. त्याला शोधण्यासाठी पोलीस त्याच्या घरीही गेले होते. मात्र तो फरार झाला होता. तेव्हापासून जयदीप आपटेला ( Jaydeep Apte ) अटक करण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली होती.

हे पण वाचा- Jaydeep Apte : शिल्पकार जयदीप आपटेला कशी झाली अटक? ‘या’ प्रश्नांची उत्तरं उलगडणार?

जयदीप आपटे पोलिसांना नेमका कसा सापडला?

जयदीप आपटे हा कसाऱ्यावरून लोकल ट्रेनने कल्याण रेल्वे स्थानकात आला. कल्याणला उतरल्यावर जयदीप रिक्षा करून दूध नाका परिसरात उतरला. यावेळी जयदीपने डोक्यावर टोपी घातली होती आणि तोंडाला मास्क लावला होता. त्याच्या हातात दोन बॅग होत्या. टोपी आणि मास्क लावून जयदीप आपटे हा आपल्या राहत्या घरी कुटुंबाला भेटण्यासाठी जात होता. मात्र, इमारतीच्या गेटवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इमारतीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे ओळखपत्र पाहिल्याशिवाय पोलीस कोणत्याही रहिवाशांना इमारतीमध्ये सोडत नव्हते. जयदीप आपटे ( Jaydeep Apte ) हा इमारतीपाशी आल्यावर पोलिसांनी त्याच्याकडे आयडी कार्ड मागितले. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना त्याचा चेहरा पाहून हा जयदीप आपटेच असावा, असा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला त्याच्या नावाने आवाज दिला आणि घाबरलेल्या भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या जयदीप आपटे रडायला लागला. गयावया करु लागला त्यावेळीच पोलिसांनी त्याला अटक केली. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

Jaydeep Apte, the sculptor of the Shivaji statue that collapsed in Sindhudurg arrested.
२६ ऑगस्टपासून फरार झालेल्या जयदीप आपटेला पोलिसांनी कल्याणमधून अटक केली. (छायाचित्र-दीपक जोशी, लोकसत्ता)

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

जयदीप आपटेला आम्ही अटक केली आहे. कल्याणमध्ये तो आला तेव्हा त्याला अटक केली. आता न्यायालयीन प्रक्रिया पार पडणार आहे. तपास यंत्रणांना जयदीप आपटे सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे. आम्ही गुप्तपणे कारवाई केली. जयदीप आपटे प्रकरणाचं राजकारण करण्यात आलं, अनेकांनी राजकीय पोळ्या भाजण्याचं काम केलं त्यामुळे आम्ही गुप्तपणे ही कारवाई केली अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी माध्यमांना दिली.