पंढरपूर : माळशिरसमध्ये बघा, कुठल्या पद्धतीचे वातावरण आहे.ज्या पद्धतीने भाजपाला मत मिळाली आहे. ते बघून भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण झाली. जे मला गुंड म्हणत आहेत. ते सर्वात मोठे गुंड आहेत. माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला होता.असा गंभीर आरोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला. तर विरोधकांनी भाजपला हलक्यात घेतल्याची चूक केली आणि ती महागात पडली असा टोलाही गोरे यांनी लगाविला.

सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले.या निकालानंतर पालकमंत्री सोलापूर येथे आले हते. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राजेंद्र राउत, दिलीप माने, रणजीतशिंह शिंदे, भाजपा पदाधिकारी यांनी गोरे यांचा सत्कार केला. त्या नंतर गोरे पत्रकारांशी बोलत होते. जिल्ह्यातील तिन्ही निवडणुकीत भाजपाला कमी लेखण्याची चूक विरोधकांनी केली.आणि हि चूक त्यांना चांगलीच महागात पडली. जिल्ह्यात १३ महिने झाले. मी कसा वागतो, मी गुंड आहे का कोण आहे ? याचा अनुभव सोलापूर जिल्ह्याला आला असेल.

मात्र,जे मला गुंड म्हणत आहे. ते सर्वात मोठे गुंड आहेत. माळशिरस तालुक्यात काय परिस्थिती आहे . भाजपा कार्यकर्त्याला धमकवले जात आहे. दहशत पसरवली जात आहे. माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला. सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस याचा तपास करत आहे. हा कट कोणी रचला होता ते भविष्यात पोलीस तपासात समोर येईल. अस गंभीर आरोप गोरे यांनी केला.

रोहित पवार यांनी अजितदादा संदर्भात चौकशी झाली पाहिजे हे मत मांडला आहे. चौकशी झालीच पाहिजेल असा आमचं मत आहे. दुर्घटना झालेल्या विमानातील ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे. त्यामुळे त्याबाबतीत अधिकच बोलणं योग्य नाही. चौकशीसाठी कुठली एजन्सी असली पाहिजे. याचा निर्णय सुरक्षा एजन्सी घेतील. सुरक्षा यंत्रणा राज्य आणि केंद्र सरकार ठरवतील असे गोरे यांनी आमदार रोहित पवारांच्या प्रश्नाला उत्तर दिले. दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचाय समितीच्या निवडणुकीत विजयी उमेदवार,पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच जनतेने ज्या विश्वासाने भाजपल मत दिले त्याला तडा देणार नाही.आता विकास कामांना प्राधान्य देत सर्वान सोबत घेणार असेही पालकमंत्री म्हणाले.

सातारा पराभव स्वीकारतो : गोरे

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कारण सांगण्याची मला सवय नाही. पराभव काय झालं याचं विश्लेषण मी करणार नाही मात्र झालेला पराभव स्वीकारतो. सोलापूर कडे लक्ष होतं, त्यामुळे साताऱ्याकडे दुर्लक्ष झालं हे खरं आहे. केवळ दुर्लक्ष होणे हे एकमेव पराभवाचे कारण नाही. असे अनेक पराभवाचे धक्के स्वीकारलेले आहेत. या धक्क्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा नेहमी प्रयत्न करतो. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे पराभव आणि विजयी अंतिम नसतो. कामात सातत्य असले पाहिजे असे पालकमंत्री गोरे यांनी सातारा जिल्ह्यातील पराभव बद्दल मत व्यक्त केले.