नांदेडच्या सुपुत्राचा सन्मान; झारखंडचे अपर पोलीस महासंचालक संजय लाठकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

संजय लाठकर यांनी भारतीय पोलीस सेवेत गेली २६ वर्षे देशातील बिहार, झारखंड, महाराष्ट्र राज्यात व सीआरपीएफ मध्ये सेवा बजावली आहे.

Jharkhand Additional Director General of Police Sanjay Lathkar awarded President Medal

भारतीय पोलीस सेवेतील १९९५ बॅचचे झारखंड राज्यात कार्यरत असलेल्या अपर पोलिस महासंचालक, (कायदा व सुव्यवस्था) संजय आनंदराव लाठकर, यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले आहे. प्रतिष्ठित मानला जाणारा बहुमान हा देशातील पोलीस दलातील निवडक अधिकाऱ्यांना दिला जातो.

संजय लाठकर यांनी भारतीय पोलीस सेवेत गेली २६ वर्षे देशातील बिहार, झारखंड, महाराष्ट्र राज्यात व सीआरपीएफ मध्ये सेवा बजावली आहे. या दरम्यान विविध पदांवर केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना यापूर्वी आठ विभिन्न पदके देऊन सन्मानित करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक, दोन वेळा आंतरिक सुरक्षा पदक, मुख्यमंत्री झारखंड यांचे शौर्य पदक, राष्ट्रपती यांच्याद्वारे घोषित गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक व केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक इत्यादींचा समावेश आहे.

बिहार व झारखंड राज्य सरकार द्वारा त्यांना यापूर्वी अनेक प्रसंगी पुरस्कृत करण्यात आलेले असून सीआरपीएफ मधे गडचिरोली व नागपूर येथे डीआयजी तसेच रांची व मुंबई येथे आयजीपी म्हणून नक्षलविरोधी मोहिमेत बजाविलेल्या उत्कृष्ट कामगिरी व प्रशासनासाठी ११ डीजी, सीआरपीएफ प्रशंसा डिस्क देण्यात आलेली आहेत. तसेच लाठकर यांना आत्तापर्यत ६० पेक्षा अधिक प्रशस्तिपत्रेही मिळालेली आहेत.

महाराष्ट्र राज्यात संजय आ. लाठकर यांनी परभणी व लातूर या जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक, पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त व दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी अशा महत्वपुर्ण पदांवर कार्य केलेले असून त्यांना महाराष्ट्र शासनाने दोन वेळा सन्मान पत्र व राज्य अल्पसंख्याक आयोगाने महात्मा गांधी शांतता पुरस्कार देवून गौरवले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jharkhand additional director general of police sanjay lathkar awarded president medal abn

Next Story
Republic Day: रोज राष्ट्रगीत वाजणारं महाराष्ट्रातील एकमेव गाव; नऊ वाजून १० मिनिटांना सारं गाव होतं ‘सावधान’
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी