भारताने ३.५ ट्रिलियन डॉलर जीडीपीचा टप्पा पार केल्यानंतर भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावर सत्ताधारी मोदी सरकारवर आणि भाजपावर टीकास्त्र डागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे. ‘किमान शालेय पातळीवरचं अर्थशास्त्र शिका हो’, असं म्हणत आव्हाडांनी भाजपाला टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, “इंग्लंडचा जीडीपी ३.२ ट्रिलियन आहे. भारताचा ३.५ ट्रिलियन झाला म्हणून नगारे पिटणाऱ्यांनो, त्यांना फक्त ६.८ कोटी लोकांचं कल्याण करायचं आहे. आपल्याला १४० कोटी लोकांचं कल्याण करायचं आहे. किमान शालेय पातळीवरचं अर्थशास्त्र शिका हो!”

दरम्यान, याआधी आव्हाडांनी आणखी एक ट्वीट करत भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते, “भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. प्रथमच भारतावरील इतर देशांचे कर्ज अर्थात विदेशी कर्ज एकूण ६२०.७० अब्ज डॉलर्स पार गेले असून ते परकीय चलन साठ्यापेक्षा अधिक झाले आहे. एकीकडे महागाईने कहर केलेला असताना देशावर मोठ्या प्रमाणावर वाढते कर्ज कशाचे द्योतक आहे?”

हेही वाचा : “…तर एसी फेकू आंदोलन करू”, जितेंद्र आव्हाडांचा रेल्वे प्रशासनाला इशारा, डेसिबल संदर्भात रेल्वेला सुनावले खडेबोल

एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून एकीकडे भाजपाकडून मोदी सरकारच्या कामगिरीचं कौतुक होत आहे, तर विरोधी पक्षांनी भाजपाच्या या प्रचारावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे जीडीपीच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि भाजपा आमनेसामने आल्याचं चित्र आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad criticize modi government bjp over indian economy gdp pbs
First published on: 05-09-2022 at 11:35 IST