राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटातील वादाबाबत मोठं विधान केलं आहे. नुकतंच भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये हाणामारी झाली आहे, त्यावरूनच काय सुरू आहे ते ओळखा…असं सूचक विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं. दोन दिवस थांबा, ठाण्यात कुणाचा बंगला तुटेल, ते तुम्हाला कळेल, असंही आव्हाड म्हणाले. आव्हाडांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ठाण्यात कोणत्या नेत्याचा बंगला पाडला जाणार आहे? असं विचारलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “कारवाई कोणावर होणार? हे तुम्हाला दोन-चार दिवसात कळेलच. जेव्हा काहीजण बंगला पाडण्यासाठी जातील, तेव्हा तुम्हाला कळेल. जरा थांबा… थोडा सस्पेन्स राहू द्या…” असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

हेही वाचा – “सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्रीलंपट…”, जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक ट्वीट

भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटातील नेत्यांमधील वादावर भाष्य करताना आव्हाड म्हणाले, “दोन गाड्यांमधून समोरासमोरून गोळीबार होतो. या प्रकरणात केवळ एकावरच गुन्हा दाखल केला जातो. दुसऱ्याला सोडून दिलं जातं. त्यावर कोणताही गुन्हा दाखल केला जात नाही. एकाच्या छातीत गोळ्या घुसल्या, त्याची तक्रारच दाखल करून घेतली नाही. म्हणजे आम्ही सांगितलं तरच तक्रार घ्यायची, आम्ही सांगितलं नाही तर तक्रार घ्यायची नाही, असा कारभार सुरू आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा नेमकी कोण चालवत आहे? हा प्रश्न निर्माण होत आहे,” असा गौप्यस्फोट आव्हाडांनी केला.

हेही वाचा- “जितेंद्र आव्हाडांनी आता औरंगजेबाचं मंदिर उभारावं आणि उद्घाटनाला अजित पवार…” नरेश म्हस्केंचा खोचक सल्ला

हा गोळीबार नेमक्या कोणत्या नेत्यांमध्ये झाला? याचा स्पष्ट उल्लेख आव्हाडांनी केला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच येत्या काही दिवसात ठाण्यात कोणत्या बड्या नेत्याचा बंगला पाडला जाणार आहे? याबाबतही तर्क वितर्क लावले जात आहेत.