देशातील जनतेला आणि नेत्यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. ही निवडणूक अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपली आहे. देशभरातले जवळपास बहुतांश राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. युत्या-आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा देखील सुरू झल्या आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षांविरोधी विरोधी पक्ष एकजूट तयार करत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातही शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करून भाजपासमोर तगडं आव्हान निर्माण केलं आहे. अशातच नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे काँग्रेससह मित्रपक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये महाविकास आघाडीची पुढची दिशा, तिन्ही पक्षांच्या वज्रमूठ सभा आणि आगामी निवडणुकांबाबत चर्चा होत असल्याची माहिती मिळाली आहे. तिन्ही पक्षांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा केल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
sangli
सांगलीच्या निर्णयाने कार्यकर्ते अस्वस्थ; निवडणुकीवर बहिष्कार अथवा बंडखोरीची मागणी
Manoj Jarange Patil reacts on who will get support by maratha community in Lok Sabha elections
लोकसभा निवडणुकीबाबत मराठा समाज कोणाच्या बाजूने? मनोज जरांगे पाटील म्हणाले, “उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे व्हा…”
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी

हे ही वाचा >> अकोल्यात ‘त्या’ रात्री काय घडलं? नाना पटोलेंनी सांगितला दंगलीचा संपूर्ण घटनाक्रम, गृहमंत्री फडणवीसांना म्हणाले…

महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तिन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत १६-१६-१६ जागांच्या फॉर्म्युलावर निवडणूक लढतील अशी चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील या बैठकीला होते. त्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींनी आव्हाड यांना यासंबंधी प्रश्न विचारला. महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभेचा काय फॉर्म्युला ठरला आहे असा प्रश्न आव्हाड यांना विचारल्यावर आव्हाड म्हणाले, मला काहीच माहिती नाही. मी त्या बैठकीत आंधळा, मुका बहिरा होतो.