अजित पवारांना बाजूला करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतो आहे. चारही बाजूंनी त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. अजित पवार यांचे कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड हे नाव घेऊन बोलत असतात. हिंमत असेल तर भाजपाला बोला. उठलंसुठलं की माझ्यावर तोंडसुख घेऊ नका.

समाज कल्याण विभागाच्या जाचक अटी

समाज कल्याण विभागाने मागासवर्गीय समाजासाठी जाचक अटी घातल्या आहेत. त्यामुळे कुणी विद्यार्थी परदेशात शिकायला जाणार नाही. ७५ टक्केंची अट घालण्यात आली आहे तसंच उत्पन्नाची अटही ८ लाख रुपये केली आहे. ज्यावेळी मनुस्मृती डोक्यात जाते तेव्हा असे विचार येतात. मागासवर्गीय समाजाने शिकू नयेत म्हणून हे प्रयत्न चालले आहेत. ओबीसी भटक्या जमाती यांच्या स्कॉलरशिपची अडचण यामुळे निर्माण झाली आहे असाही आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.

हे पण वाचा- जितेंद्र आव्हाडांचा टोला, “शरद पवार चक्रधारी श्रीकृष्णाप्रमाणे, जे शिशुपाल होते त्यांचा…”

शरद पवारांवर कुणीही टीका केली तरीही मी सोडत नाही

शरद पवारांवर कुणीही टीका केली तर तो टीका करणारा व्यक्ती कितीही मोठा असू द्या मी सोडत नाही. असंही आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले. मी कधीही शरद पवार रागावतील याचाही विचार करत नाही. शरद पवार माझे बॉस त्यांच्यावर कुणीही बोलणार असेल तर मी सोडत नाही असंही आव्हाड म्हणाले.

अजित पवारांना भाजपातून बाजूला करण्याचा प्रयत्न

राज्यातील पराभवाला अजित पवार जबाबदार असतील तर भाजपाच्या उत्तर प्रदेशातही कमी जागा आल्या. तिथेही कुठल्या अजित पवारांना शोधलं आहे का? तसंच अजित पवार गटाकडून आमच्यावर टीका होते आहे, मात्र गजा मारणेबरोबर चहा प्यायला कोण गेलं होतं? जिनके घर शिशे के होते हैं, वो दुसरो के घरोपर पत्थर नहीं फेका करते. असं आव्हाड म्हणाले. तसंच भाजपाकडून अजित पवारांना बाजूला करण्याचा प्रयत्न होतो आहे. चारही बाजूंनी त्यांच्यावर हल्ले होत आहेत असाही आरोप आव्हाड यांनी म्हटलं आहे.