Jitendra Awhad : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. तसेच खातेवाटपही करण्यात आलं. मात्र, यानंतरही अद्याप महायुतीच्या काही मंत्र्यांनी मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारलेला नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर बोलताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं, अशीही इच्छा व्यक्त केली. तसंच एक वक्तव्यही केलं. ज्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले.

नरहरी झिरवाळ काय म्हणाले होते?

राजकारणात काही गोष्टी घडत असतात आणि त्या घडून गेल्या आहेत. आम्ही देखील चूक केली असं म्हणा किंवा बरोबर केलं असंही म्हणता येईल. मात्र, आम्हाला विश्वास होता की आम्ही शरद पवारांना सोडून गेलं तर ते आम्हाला वेगळं समजणार नाहीत, म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. जनतेनेही मला पुन्हा एकदा आमदार केलं. शरद पवार हे सर्वसामान्याचे नेते आहेत. त्यामुळे ते निक्कीच याबाबत विचार करतील. तसेच जी चाललेली हेळसांड आहे, हेळसांड कशी तर हे सांगतो की, जेव्हा अजित पवारांनी पहाटे शपथ घेतली होती, तेव्हा मी दिल्लीला गेलो होतो. तेव्हा बोलताना मी म्हटलं होतं की मी शरद पवारांबरोबर आहे. जर माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील, असं म्हटलं. मात्र, काही लोकांनी याचा गैरप्रचार केला. खरं तर प्रचार हा प्रचार असतो. मी शरद पवारांच्या किती जवळ होतो हे सांगायचं झालं तर मी जेव्हापासून शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेलो, तेव्हापासून आजपर्यंत शरद पवारांना भेटलेलो नाही. याचं कारण कोणत्या तोंडाने शरद पवारांच्या समोर जायचं? एवढ्या दिवस गेलो नाही. मात्र, आता शरद पवारांकडे जाणार आणि लोटांगण घालून पाया पडणार आणि म्हणणार साहेब काहीही करा पण आमच्या सारखे अनेक आहेत, ज्यांना अडचण झालेली आहे म्हणून एकत्र या”, असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं. याच वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

Rakhi Sawant
“चूक केली; पण त्याला…”, राखी सावंतने घेतली रणवीर अलाहाबादियाची बाजू; म्हणाली…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
K T Rama Rao On Delhi Election Result
Delhi Election Result : ‘विजय भाजपाचा, पण अभिनंदन राहुल गांधींचं…’; BRS च्या कार्याध्यक्षांची दिल्लीच्या निकालावर खोचक प्रतिक्रिया!
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
mahant namdevshastri latest news in marathi
“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा
What Jitendra Awhad Said?
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचा टोला, “…तर धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात”
Ashish Shelar on Raj Thackeray
Ashish Shelar: “मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देतो की…”, राज ठाकरेंनी निकालावर संशय घेताच भाजपाचा पलटवार
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का? हा प्रश्न मला कधीही विचारु नका. झिरवाळ यांनी नौटंकी वगैरे करायची गरज नाही. शरद पवार माणूस आहेत आणि त्यांना हृदय आहे. दैवत म्हणत आहेत, दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का? झिरवाळांना उपसभापती कुणी बनवलं होतं? शरद पवार यांच्या दुःखाचा विचार केला आहे का? आम्हाला सत्ता चाटण्याची गरज प्रत्येकवेळी वाटत नाही असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Story img Loader