राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेब, शाहिस्तेखानाविषयी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपाने ठिकठिकाणी निदर्शने करत आव्हाड यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला. मात्र आव्हाड त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका तसेच त्यांनी केलेले विधान यावर सविस्तर भाष्य केले आहे. मी एका अराजकीय मंचावर बोललो होतो. त्यामुळे राष्ट्रवादी माझ्या वक्तव्याला पाठिंबा देण्याचा प्रश्न नाही, असे आव्हाड म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> विरोधकांच्या टीकेनंतर आव्हाड आक्रमक, म्हणाले “तुरुंग काढून वीर सावरकरांना…”

तेव्हाही माझ्या मागे राष्ट्रवादी पक्ष नव्हता

“मी एका अराजकीय मंचावर उभा होतो. माझ्यासोबत सुषमा अंधारे यादेखील आहेत. आमच्या पोस्टवरवर कोठेही राष्ट्रवादीचे नाव नाही. मी जेव्हा शिवसन्मान जागर यात्रा घेतली होती, तेव्हाही माझ्या मागे राष्ट्रवादी पक्ष नव्हता. मात्र तरीदेखील मी दोन महिने फिरलो. त्यावेळी आम्ही बाबासाहेब पुरंदरे यांना विरोध केला,” असे आव्हाड यांनी सांगितले.

पक्षाच्या राजकीय भूमिकेशी आपण सुसंगत असले पाहिजे, पण…

“प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भूमिका वेगळी असते. माझी एखादी सामाजिक भूमिका असेल तर पक्षातील दुसऱ्याचाही तशीच भूमिका असेल असे नाही. पक्षाच्या राजकीय भूमिकेशी आपण सुसंगत असले पाहिजे. पण ऐतिहासिक भूमिकेत तुमची मतमतांतरं असू शकतात. म्हणूनच आम्ही राष्ट्रवादीत आहोत,” असेही आव्हाड यांनी सांगितले.

हेही वाचा >>> शिवाजी महाराजांविषयीच्या विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांचे नवे ट्वीट, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “मी जे बोललो ते…”

मी औरंगजेबाचे कौतुक करत नाही…

अजित पवार यांनी संभाजी महाराज धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षक होते, असे विधान केले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाविषयी केलेल्या विधानानंतर वाद झाला होता. त्यावरही आव्हाड यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. “मी फक्त औरंगजेबाने बाजूचे मंदिर पाडले नव्हते, असे म्हणालो होतो. आजही जाऊन पाहिले तर तेथे मंदिर दिसेल. मी औरंगजेबाचे कौतुक करत नाही. यामध्ये असलेले कांगोरे बघावेत असे माझे मत आहे,” असे स्पष्टीकरण आव्हाड यांनी दिले.

हेही वाचा >>> हिंदू महासंघ संघटनेचे आनंद दवे कसबा पोटनिवडणूक लढणार, शैलेश टिळक यांची घेतली भेट

मी एक तास सहा मिनिट भाषण केले, पण…

“मी परवा केलेल्या विधानावर अजूनही ठाम आहे. मी ते विधान जाणूनबुजून केलेले नाही. मी एक तास सहा मिनिट भाषण केले आहे. मात्र फक्त अर्ध्या मिनिटाचा व्हिडीओ दाखवला जात आहे. मी त्या व्हिडीओला नाकारत नाहीये. त्या वक्तव्याबद्दल मी अनेक संदर्भ दिले आहेत,” असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad stands on his comment about his shivaji maharaj controversial comment prd
First published on: 06-02-2023 at 18:36 IST