अलिबाग : गुरुवारी अलिबाग समुद्रात जे एस डब्ल्यु कंपनीचे बार्ज भरकटले. हे जहाज धरमतर कडून जयगडच्या दिशेने निघाले होते. या बार्ज वरील सर्व खलाशी सुखरूप आहेत. अडकलेल्या खलाशांना तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत बाहेर काढले जात आहे. खराब हवामान, सोसाट्याचा वारा आणि दृष्यमानता कमी असल्याने हे जहाज भरकटले होते. ते अलिबाग कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस आले. या ठिकाणी ते नांगरून ठेवण्यात आले आहे. या बार्ज वर १४ खलाशी होते. गुरुवारी अलिबाग जवळील समुद्रात जे एस डब्ल्यू कंपनीचे बार्ज भरकटले. हे जहाज खराब हवामानामुळे भरकटले होते. रात्री अंधार आणि खराब हवामानामुळे मदत व बचाव कार्य पूर्ण करता आले नव्हते. सकाळी तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत खलाशांना बाहेर काढण्यात आले.#alibag #Boatastray pic.twitter.com/4CBJZsOxUZ— LoksattaLive (@LoksattaLive) July 26, 2024 हेही वाचा.Petrol-Diesel Price Today: सोने स्वस्त झाल्यानंतर इंधनाच्या किमतीत मोठा बदल, मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलची किंमत काय? घटनेची माहिती मिळताच अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.जे.एस डब्ल्यु कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.त्यानंतर कंपनीची यंत्रणा बार्ज काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली. रात्री उशीरा बार्ज काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र अंधार आणि खराब हवामानामुळे रात्री मदत व बचाव कार्य पूर्ण करता आले नव्हते. सकाळी तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत खलाशांना बाहेर काढण्यात आले.