लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : महिलेच्या  हाती गावची दोरी ती गावचा उध्दार करी या उक्तीप्रमाणे गावच्या विकासासाठी आलेल्या पै न् पैचा हिशोब डिजीटल फलकाच्या माध्यमातून पारदर्शी कारभाराचा नमुना जुने खेड (ता. वाळवा) गावाने दाखवला  आहे. सरपंच असलेल्या प्रियांका पाटील यांनी विकास  कामातील ठेकेदारी बाजूला सारून गावच्या कारागिरांना योग्य मोबदला देत अंदाजपत्रकापेक्षाा कमी निधीत सार्वजनिक काम पूर्ण करून उरलेल्या रकमेतून अन्य विकास कामेही पूर्ण केली आहेत.

गाव अवघं  ४२६ उंबर्‍याचं. लोकसंख्या अडीच हजार. मात्र, तीन वर्षापुर्वी गावात राजकारण विरहीत समाजकारण करायचे या उद्देशाने थेट सरपंच पदाची निवडणूक लढवून इलेक्ट्रोंनिक अभियांत्रिकी मधील पदवी शिक्षण घेतलेल्या प्रियांका पाटील यांनी कार्यभार हाती घेतला. सर्व सदस्यांना विश्‍वासात घेउन ग्रामपंचायतीचा कारभार आदर्श करण्याचा विडा तर उचललाच पण याचबरोबर शासनाकडून वित्त आयोगाच्या माध्यमातून येणारा निधी, गावात जमा होणारा घरपट्टी, पाणी पट्टी कर याचा हिशोबही गावचे मालक असलेल्या सामान्य गावकर्‍यांनाही समजला पाहिजे हा हेतू मनात होताच. यातून वर्षाअखेर गावात जमा झालेला निधी, शासनाकडून मिळालेला निधी आणि पगारावर झालेला खर्च, सार्वजनिक कामासाठी करण्यात आलेला खर्च याचा हिशोब डिजिटल फलकाच्या माध्यमातून गावकर्‍यासमोर गावात चार ठिकाणी जाहीर केला आहे.

 विकास कामे अंदाजपत्रकापेक्षा दर्जेदार काम करून निधी शिक राहतो. त्याच उर्वरित निधीतून गावातील गटार, बोळ रस्ता सुधारणा ही कामे पूर्ण केली जात असल्याचे सरपंच श्रीमती पाटील यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिक्षक उपलब्ध करून तर दिलेच, पण स्वत: सुशिक्षित असल्याने शाळेत जाउन मुलांनाही धडे देण्याचे काम आवडीने करत असल्याचे त्यांनी सांगितले.

गावात ३२ बचत गटाची स्थापना करण्यात आली असून बचत गटाच्या माध्यमातून चिक्की व पापड ऑनलाईन विक्री सुध्दा केली जात आहे. गावातील प्रमुख ठिकाणी १२, शाळेत ८ आणि ग्रामपंचायतीत ४ असे २४ कॅमेर्‍याद्वारे गावातील हालचाली सीसीटीव्हीच्या माध्यमातून नोंदल्या जात आहेत. गावचे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून यामाध्यमातून करभरणा, गावचे दाखले व अन्य माहिती डिजिटल स्वरूपात दिली जात असून या माध्यमातून ३५ सेवा गावकर्‍यांना हातातील मोबाईलवर देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महिलासाठीही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून महिला दिनाच्या निमित्ताने पाककला, रांगोळी या स्पर्धा सोबतच मनोरंजन आणि व्यासपीठ धाडस महिलांच्यात निर्माण करण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. याशिवाय महिलांची आरोग्य तपासणी करून अ‍ॅनेमियाबाधित महिलांना पोषण आहाराचे महत्व पटवून त्यांचे आरोग्य आधिक सदृढ व्हावे यासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत असेही सरपंच श्रीमती पाटील यांनी सांगितले.

हुतात्मा सहकारी बँकेला गेल्या आर्थिक वर्षात १८ कोटी ५० लाख रूपये ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे संस्थापक वैभवकाका नायकवडी यांनी दिली.श्री. नायकवडी यांनी सांगितले, नियोजनबध्द व पारदर्शक कारभारामुळे सभासदांचा विश्‍वास  कमावला आहे. यामुळे बँकेकडे ४६५ कोटींच्या ठेवी व २६६ कोटीची कर्जे आहेत. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने ७३०  कोटींचा व्यवसाय करत १८ कोटी ५० लाखांचा  ढोबळ नफा मिळवला. बँकेचा निव्वळ एनपीए शून्य असून ढोबळ एनपीए ४.२२ टक्के आहे. भागभांडवल ११ कोटी ४८ लाख रूपयापर्यंत पोहचले आहे. बँकेच्या १९ शाखा  कार्यरत असून महाराष्ट्र कार्यक्षेत्र आहे.

यावेळी  अध्यक्ष किरण नायकवडी, उपाध्यक्ष बाजीराव मांगलेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत चव्हाण यांच्यासह संचालक उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील उसउत्पादकांचे १८० कोटी रूपये साखर कारखान्याकडे थकित आहेत. कारखान्यांनी येत्या आठ दिवसात एफआरपीनुसार १८० कोटींचा भरणा केला नाही तर साखर आयुक्ताना संबंधित कारखान्यावर कारवाई करण्यास भाग पाडू असा असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना श्री. शेट्टी यांनी सांगितले, कारखाने बंद होउन दोन महिने झाले. मात्र, गाळप झाल्यानंतर १४ दिवसात उसाचे पैसे देणे कायद्याने बंधनकारक असतानाही अद्याप कारखान्यानी १८० कोटी रूपये थकवले आहेत. याचा साखर आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू आहे. आता आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कारखान्यांनी उस उत्पादकांचे पैसे दिले नाहीत तर साखर आयुयतांकडे कारवाईसाठी आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने भरपाई देण्याची घोषणाही केली आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात याबाबत काहीच हालचाल दिसत नाही.

शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा बदलला असला तरी या गावातील शेतकरी वाचले असले तरी अन्य ठिकाणचे शेतकरी यामध्ये अडकणार आहेत. समांतर मार्ग असताना शक्तीपीठाचा अट्टाहास का असा आमचा सवाल असून शक्तीपीठ महामार्गच रद्द करा अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठीचा लढा आमचा सुरूच राहील असा निर्वाळाही त्यांनी दिला.