Justice Chandiwal : १०० कोटींच्या खंडणीचं टार्गेट आपल्याला मविआच्या काळात गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी दिलं होतं असा आरोप माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी मविआ सरकारच्या काळात केला होता. अनिल देशमुखांचं गृहमंत्री पद गेलं होतं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला जाणीवपूर्वक या सगळ्या प्रकरणांत अडकवलं असं म्हटलं होतं. तसंच चांदिवाल आयोगाचा अहवाल समोर का आणला जात नाही? असाही सवाल केला होता. त्यावर आता जस्टिस चांदिवाल यांनी मोठा खुलासा केला आहे. अनिल देशमुख आणि सचिन वाझेंनी देवेंद्र फडणवीस यांना गुंतवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर सचिन वाझे हुशार माणूस त्यांच्याकडे भरपूर मटेरियल होतं असंही चांदिवाल ( Justice Chandiwal ) यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले जस्टिस चांदिवाल?

सचिन वाझे यांची चौकशी सुरु असताना मविआ सरकारच्या काळात पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करतांना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा उल्लेख केला होता. त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात ही बाब नमूद केली नव्हती. तसंच चौकशी सुरु असताना त्यांनी हा विषय पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हे रेकॉर्डसह हे सगळं काही समोर आणलं होतं. पण मी त्यांना महत्त्व दिलं नाही. कारण ही चौकशी सुरु असताना ठाण्याचे एक डीसीपी आणि अॅडव्होकेट सातत्याने हस्तक्षेप करत होते. ठाण्याचे डीसीपी ऑफिस सोडून मुंबईत कसे येऊन बसतात? असाही प्रश्न मला तेव्हा पडला होता असं चांदिवाल यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला चांदिवाल ( Justice Chandiwal ) यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.

What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : नाही तर ईडी, सीबीआय आहेतच!
There should be no political interference in municipal programs says MLA Sneha Dubey Pandit in vasai
आमदार स्नेहा दुबे पंडित यांचा बविआला पहिला धक्का; “कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप नको”, पालिका अधिकार्‍यांना ताकीद
devendra fadnavis nitin gadkari
फडणवीसांच्या निवडीवर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्याच्या विकासाला …”
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : जॉन रॉल्सची न्यायाची मूलभूत संकल्पना
sanjay raut DY chandrachud
“माजी सरन्यायाधीश चंदचुडांनी देशात आग लावली”, महाराष्ट्र व संभलचं उदाहरण देत ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप

सचिन वाझे अत्यंत हुशार आणि चाणाक्ष

सचिन वाझेंची चौकशी करताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचा एक What’s App मेसेज दाखवला होता. त्यामध्ये ४० लाख रुपयांचा उल्लेख होता. सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं. पण ते कधीकधी त्यांच्या वकिलांनाही जुमानायचे नाहीत. सचिन वाझे हुशार आणि चाणाक्ष माणूस होता असंही जस्टिस चांदिवाल ( Justice Chandiwal ) यांनी म्हटलं आहे.

“सचिन वाझे -अनिल देशमुखांनी फडणवीसांना गुंतवण्याचा..”, जस्टिस चांदिवाल काय म्हणाले?

वाझे, सिंग आणि देशमुख यांचं त्रिकुट

सचिन वाझे, अनिल देशमुख आणि परमबीर सिंग यांचं त्रिकुट त्या काळात होतंच हे दिसत होतं. तसंच सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची बैठक झाली होती एवढंच नाही तर परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांचीही बैठक झाली होती असंही जस्टिस चांदिवाल यांनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर अनिल देशमुख यांना मी क्लीन चिट देण्यात आलेली नाही. मी तो शब्द माझ्या अहवालात वापरलेला नाही. मला पुरावे दिले गेले नाहीत असं चांदिवाल यांनी स्पष्ट केलं. अनिल देशमुख आणि सचिन वाझे हे तेरी भी चूप मेरी भी चूप असं वागत होते हे वास्तव आहे. आता ते आरोप-प्रत्यारोप करत आहेत ते त्यांचं त्यांना लखलाभ असो. असंही जस्टिस चांदिवाल ( Justice Chandiwal ) म्हणाले.

२७ एप्रिलला मी माझा अहवाल सोपवला होता-चांदिवाल

२७ एप्रिल २०२२ ला मी त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंकडे मी अहवाल सोपवला होता. त्यामध्ये ज्या बाबी मांडल्या आहेत त्या कुठल्याही शासनाच्या पचनी पडणाऱ्या नाहीत. त्यामुळे तो माझा अहवाल सार्वजनिक केला गेला नसावा असं चांदिवाल यांनी म्हटलं आहे. मला शासकीय अधिकाऱ्यांनी पाहिजे तशी मदत केली नाही हे वास्तव आहे, असं चांदिवाल ( Justice Chandiwal ) म्हणाले.

Story img Loader