विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारबाबत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. या ठरावावर मतमोजणी सुरू असतानाच काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी नव्या सरकारवर राजकीय टोलेबाजी केली. आमदार गोरंट्याल मतमोजणीत आपला क्रमांक बोलत असताना इतर आमदारांनी त्यांना डिवचलं. त्यावर गोरंट्याल यांनी मी शेर म्हटलं तर माझ्यामागे ईडी लागेल, असा टोला लगावला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आक्षेप घेत आत्ता केवळ मतमोजणी होईल असं म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतमोजणी अधिकारी समोर आल्यानंतर आपला क्रमांक बोलताना कैलास गोरंट्याल म्हणाले, “शेर म्हटलं तर माझ्यामागे ईडी लागेल. राजकारणात साम, दाम, दंड, भेद या गोष्टी असतात. मात्र, आजकाल ईडी, आयकर विभाग आणि राज्यपाल गरजेचा झाला आहे. कैलास गोरंट्याल ‘अबतक छप्पन'” यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी येथे केवळ मतमोजणी होईल. बाकी भाषणं आपण शेवटी करू, असं मत व्यक्त केलं.

शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी शिंदे गट आणि भाजपाने १६४ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली, तर तीन आमदार तटस्थ राहिले.

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. सुरुवातीला आवाजी मतदान झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी कऱण्यात आली. यावेळी भाजपा-शिंदे सरकारने १६४ मतांसहित बहुमताचा आकडा पार केला आणि विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली.

अधिकृत व्हीप नेमका कोणाचा? शिवसेनेची याचिका; पण सुप्रीम कोर्टात तातडीने सुनावणी घेण्यास पुन्हा नकार

अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख अनुपस्थित राहिले. उशिरा आलल्याने त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही. तर प्रणिती शिंदे, जितेश अंतापुरकर कालही अनुपस्थित होते आणि आजही अनुपस्थित राहिले. जितेश अंतापूरकर यांचं लग्न असल्याने अनुपस्थित होते तर प्रणिती शिंदे या परदेशी आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kailash gorantyal political comments on ed during trust vote in assembly session pbs
First published on: 04-07-2022 at 13:09 IST