Sahar Shaikh : मुंबईसह, ठाणे, नाशिक, पुणे अशा २८ महापालिकांची निवडणूक या वर्षी जानेवारी महिन्यात पार पडली. या निवडणुकीनंतर जे निकाल आले त्या निकालांमध्ये सहर शेखची चर्चा सर्वाधिक झाली. सहर शेख ही एमआयएमची नगरेवक आहे. तिने मुंब्रा या ठिकाणाहून निवडणूक जिंकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तिला तिकिट हवं होतं. पण ते दिलं गेलं नाही, त्यामुळे हा पक्ष सोडून सहरने एमआयएममध्ये प्रवेश केला होता आणि जिंकल्यावर जितेंद्र आव्हाड यांना डिवचत ‘कैसा हराया’ हे विधान करत भाषण केलं होतं. आता याच सहर शेखचं नगरसेवक पद धोक्यात आलं आहे. नेमकं हे प्रकरण काय? जाणून घेऊ.
जात पडताळणीच्या दाखल्याचं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे मूळ रहिवासी असलेले सहर शेखचे वडील युनूस इकबाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. त्यांनी इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना-८ वापरून व अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळविला. तर सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले. ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षातून मुंब्रा येथील प्रभाग ३० मधून निवडणूक जिंकली. सहरने विजयी रॅलीमधील भाषण चांगलंच गाजलं आणि त्या भारतभर चर्चेत आल्या. मात्र, आता सहर शेखने निवडणूक लढविताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचं सांगितलं जात आहे. खरोखरच हे दावे सिद्ध झाले तर सहर शेखचं नगरसेवकपद जाण्याची शक्यता आहे.

१८ मार्चला सहरचे वडील सुनावणीसाठी गैरहजर
ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्धीकी फरहा सबाब अहमद यांनी युनूस शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती. युनूस यांनी स्थलांतरितांना नमुना-१० लागू असताना नमुना-८ वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळवला. त्याआधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी केली होती. ठाणे तहसीलदारांनी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने १८ मार्च रोजी घेतलेल्या सुनावणीस आजाराचे कारण देत युनूस गैरहजर राहिले. सुनावणीस उपस्थित असलेल्या त्यांच्या वकिलांनी जात दाखल्याची रंगीत फोटो कॉपी व काही कागदपत्रे सादर केली. त्याच्या पडताळणीसाठी पुन्हा २३ मार्चला सुनावणी घेण्यात आली. यावेळी ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात दाखल्यामधील त्रुटी काढल्या, तर ठाण्याच्या रहिवासी असतानाही सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे. ज्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे.
प्रभाग क्रमांक ३० मधून निवडून आली आहे सहर शेख
ठाणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक ३० मधून सहर शेख ही एमआयएमची तरुण नगरसेविका विजयी झाली. जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देऊन जिंकणारी ही नगरसेविका सध्या जानेवारी महिन्यात चर्चेत होती. ‘कैसा हराया…’ असा प्रश्न विचारत तिने भाषण केलं, जे व्हायरल झालं होतं. आता जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला आहे आणि सहर शेख पुन्हा चर्चेत आली आहे.
कोण आहे सहर शेख?
१) सहर शेख या केवळ नवख्या नेत्या नाहीत, तर त्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या आहेत.
२) सहर शेख यांचे वडील युनूस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष होते.
३) सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे लेकीसाठी तिकिट मागितले होते.
४) तिकिट नाकारल्यानंतर सहर यांनी AIMIM पक्षाकडून निवडणूक लढवली.
सहर शेख सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
५) सहर शेख यांचे इन्स्टाग्रामवर ३ लाख ४० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
सहर शेखने जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं होतं
ठाणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक ३० मधून सहर शेख ही एमआयएमची तरुण नगरसेविका विजयी झाली. जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देऊन जिंकणारी ही नगरसेविका सध्या जानेवारी महिन्यात चर्चेत होती. ‘कैसा हराया…’ असा प्रश्न विचारत तिने भाषण केलं, जे व्हायरल झालं होतं. आता जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला आहे आणि सहर शेख पुन्हा चर्चेत आली आहे.
हिजाबवाली नगरसेविका म्हणून सहर शेख प्रसिद्ध
ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड नंबर ३० मधून AIMIM ची तरूणी हिजाबवाली ही नगरसेविका म्हणून निवडून आली आहे. सहर शेख असे या नवनिर्वाचित नगरसेविकेचे नाव आहे. सहर शेखच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. तरुण सहर शेख यांनी थेट जितेंद्र आव्हाडांना डिवचल्याने चर्चेत आली होती सहर शेखचे वडील युनुस शेख आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद सर्वश्रृत आहेत. लेकीच्या विजयानंतल यूनुस शेख म्हणाले होते की, अल्लाहने ‘हिजाबवाल्या’ लेकीला देशात फेमस केलं आहे. वडील आणि मुलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता याच सहरच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.
