सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या वतीने शुक्रवार दि .६ ऑक्टोबर रोजी ‘होऊ दे चर्चा विचारा प्रश्न.!’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त वैभववाडी, देवगड आणि कणकवली तालुक्यात  कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वैभववाडी येथे छ. संभाजी राजे चौक, सायं. ४ वाजता देवगड, आणि सायं. ६ वाजता कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे या कॉर्नर सभा होणार आहेत.

यावेळी शिवसेना सचिव खा. विनायक राऊत, अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते गौरीशंकर खोत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत,विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, राजू शेटय़े, नंदू शिंदे, मंगेश लोके, मिलिंद साटम, जयेश नर, सचिन सावंत, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, प्रमोद मसुरकर, उमेश वाळके, राजू राठोड, उत्तम लोके, वैदेही गुडेकर, शिवाजी राणे, स्वप्निल धुरी, नलिनी पाटील, संतोष तारी, गणेश गावकर, हर्षां ठाकूर, सायली घाडीगावकर हे उपस्थित राहणार आहेत, असे पारकर यांनी सांगितले.

Shinde group is likely to get only one seat in Pune in the upcoming assembly elections politics news
पुण्यात शिंदे गटाच्या वाट्याला केवळ एकच जागा ?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
NCP Ajit Pawar group focus on Mahendra Thorve Karjat Khalapur Assembly Constituency news
रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघावर अजित पवार गटाचा डोळा
AIMIM, Solapur, Congress, AIMIM Solapur,
एमआयएमच्या उमेदवारीने सोलापुरात काँग्रेसच्या अडचणीत वाढ ?
AIMIM , Imtiaz Jaleel, constituency confusion,
इम्तियाज जलील यांच्यासह पाच उमेदवारांची एमआयएमकडून घोषणा, मतदारसंघाचा संभ्रम कायम
Vijay Wadettiwar, Congress MP, Chandrapur,
वडेट्टीवार यांना पराभूत करा, कॉंग्रेस खासदाराचे अप्रत्यक्ष आवाहन
Latur, BJP, NCP, Ajit Pawar, Babasaheb Patil, BJP Demands Friendly Contest in Ahmedpur, Ahmedpur Assembly Constituency, Shiv Sena, Tanaji Sawant, Mahayuti,
अहमदपूरमध्ये अजित पवार गटाबरोबर मैत्रीपूर्ण लढतीची भाजपची मागणी
Arvind Chavan, NCP, Ajit Pawar, Jalna Assembly Constituency, mahayuti, Shiv Sena, Arjun Khotkar,
जालन्यात अजित पवार गट आग्रही