-विजय पाटील

पश्चिम घाटाच्या जंगलक्षेत्रात हातबॉम्बच्या सहाय्याने वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी आलेल्या टोळीतील तिघांना वनविभागाच्या पथकाने भोसगाव (ता. पाटण) येथे सापळा रचून मोठ्या शिताफीने पकडले. त्यांच्याकडून सहा हातबॉम्ब, दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याचबरोबर याच परिसरात दोन रानडुकरे मृतावस्थेत आढळली आहेत. तर या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार

दरम्यान, शिकाऱ्यांच्या टोळीमध्ये पाच जणांचा समावेश स्पष्ट झाला आहे. त्यातील तिघांना गजाआड करण्यात वन विभागाला यश आले असले तरी दोघे संशयित फरार असल्याने त्यांचा शोध सुरू आहे. घटनास्थळ परिसरात वन्यजीवांच्या शिकारीसाठी ठेवण्यात आलेले हातबॉम्ब हस्तगत करण्यात आलेले आहे. वनखात्याच्या पथकाला आत्तापर्यंत सहा हात बॉम्ब सापडले असून, आणखी काही हातबॉम्ब मिळून येण्याची तसेच या टोळीमध्ये आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

अजय कोळी (रा. कराड), महेश मंडले व उमेश मदने दोघेही (रा. दुधोंडी ता. पलुस जि. सांगली) अशी वनखात्याने जेरबंद केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन पसार झाले आहेत त्यांचा शोध कसून घेतला जात आहे. उपवनसंरक्षक एम एन मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.