कराड : अहमदाबादमध्ये परवा गुरुवारी एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाईनर विमान कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली. या अपघातात तब्बल २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात कराड येथील ज्योती व प्रकाश ढवळीकर यांची मुलगी कल्याणी आणि जावई गौरवकुमार ब्रह्मभट यांचाही समावेश आहे. या दुर्दैवी विमान अपघातात कराडची कन्या व जावई गमावल्यामुळे कराडकरांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कराड येथील सोमवार पेठ, भैरवनाथ गल्लीत ज्योती व प्रकाश ढवळीकर वास्तव्य करतात. त्यांची अभियंता असणारी कन्या कल्याणी हिचा विवाह अहमदाबाद येथील गौरवकुमार ब्रह्मभट यांच्याशी सन २००७ मध्ये झाला होता. अहमदाबाद येथून लंडनला जाण्यासाठी एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाईनर विमानातून ते निघाले असता काळाने त्यांच्यावर घाला घातला. हे दोघेही एकाच कंपनीत नोकरीस आहेत. लंडन येथील कंपनीच्या मुख्यालयाकडे निघाले असतानाच या अपघातात त्यांना जीव गमावावा लागला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती समजतात कल्याणीचे आई, वडील, भाऊ, नातेवाईक अहमदाबादला तातडीने रवाना झाले आहेत. कराड शहरात ही बातमी पसरली. अन् कराडची एक कन्या आणि जावई गमावलीची हळहळ कराडकर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रवासादरम्यान, त्यांनी आपला मुलगा व मुलीला घरीच कल्याणीच्या सासू- सासऱ्यांकडे ठेवले होते. मुलगा इयत्ता दहावीच्या वर्गात, तर मुलगी सहावीच्या वर्गात शिकत आहे. हे दोघेही आपल्या आजी- आजोबांसोबत अहमदाबादमध्ये राहिल्याने ही नातवंडे सुदैवाने बचावली आहेत.