बीडमधून थेट धनंजय मुंडे यांच्याच विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलेल्या करुणा शर्मा मुंडे यांना कोल्हापूरमध्ये मात्र मोठा पराभव पत्करावा लागला आहे. करुणा शर्मा यांचं डिपॉझिट देखील या निवडणुकीत जप्त झालं असून त्यांना मिळालेल्या मतांचा आकडा अवघा शंभरीपार पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द करुणा शर्मा यांनी मात्र माध्यमांशी बोलताना बीडमध्ये विजयी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच, कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे कोल्हापुरातील आगामी नगरपालिका निवडणुका लढवण्याचं बळ आपल्याला मिळाल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपाच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करत ही निवडणूक जिंकली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांच्यामुळे चर्चेत आलेल्या करुणा शर्मा मुंडे यांना मात्र मतदारांनी फारसं मतदान केलेलं नाही. करुणा मुंडे यांना या निवडणुकीत अवघी १३३ मतं मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचं डिपॉझिट अर्थात अनामत रक्कम देखील जप्त झाली आहे. झी २४ तासशी बोलताना करुणा शर्मा यांनी आयोगाकडे तक्रार केल्याचं सांगितलं आहे.

eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”
ठाण्यासाठी शिंदे गटाच्या जोर-बैठका; मतदारसंघात उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही ; भाजपाला जागा जाण्याच्या चर्चेने अस्वस्थता

निवडणूक आयोगाकडे तक्रार

“मी तक्रार केली आहे की इथे आचारसंहितेचं उल्लंघन झालं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. १० तारखेपर्यंत आचारसंहिता होती. पण तरी १२ तारखेपर्यंत भाजपा आणि काँग्रेसनं सर्व वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर जाहिराती दिल्या. ४० लाखांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. यांच्या लोकांवर पैसे वाटण्याबद्दल गुन्हा देखील दाखल झाला आहे”, असं करुणा मुंडे म्हणाल्या.

विश्लेषण : महाविकास आघाडीच्या ऐक्यामुळे कोल्हापूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय!

“मी फार मोठी यंत्रणा लावली नव्हीत. माझा प्रचार होऊच दिला नाही. तुम्ही पाहाल तर कोल्हापूरच्या जनतेचे मी आभार मानते की मी दोनच दिवस प्रचार केला. पण त्यांनी मला एवढा मान दिला, की येणाऱ्या काळात मी ८१ नगरपालिकेचे उमेदवार उभे करण्याची हिंमत करू शकेन. मी फक्त दोन दिवस प्रचार केला होता”, असं देखील त्या म्हणाल्या.

धनंजय मुंडेंनी स्वतःची सहा मुलं लपवली, अनेक बायकाही लपवल्या; करुणा मुंडेंचे खळबळजनक आरोप

“बीडमध्ये नवरा वि. बायको किंवा सवत…”

“माझा फोकस बीड ते कोल्हापूर असा असेल. कारण या भागात माझे फॉलोअर्स खूप जास्त आहे. बीडमध्ये एकतर नवरा विरुद्ध बायको असा सामना होईल, नाहीतर सवत विरुद्ध सवत असा सामना होईल”, असं देखील त्या म्हणाल्या.