संगमेश्वर कसबा जिल्हा परिषद गटातून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सौ. विशाखा विजय कुवळेकर यांनी प्रभावी कामगिरी करत विजय मिळवला. उबाठा शिवसेनेच्या उमेदवार म्हणून त्यांनी पारंपरिक मतदार गट असलेल्या शिंदे सेनेच्या रचना महाडिक  यांना मोठा  धक्का देत अनेक वर्षांपासून असलेली एकहाती सत्ता मोडीत काढली. नवख्या उमेदवाराने मिळवलेल्या या दणदणीत यशामुळे कसबा गटाच्या राजकीय समीकरणात मोठा बदल झाल्याचे चित्र आहे.

विजय घोषित झाल्यानंतर सौ. कुवळेकर यांनी मतदार बांधव भगिनींचे आभार मानले. निवडणूक काळात दिलेले प्रत्येक आश्वासन सर्वांना सोबत घेऊन पूर्ण करून दाखवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विकासकामांना प्राधान्य देतांना कोणत्याही परिस्थितीत राजकारण केले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट  केले आहे.