केबीसी कंपनीच्या घोटाळ्यात पैसे अडकलेल्यांची संख्या  १४०० इतकी आहे. या तक्रार अर्जावरून फसवणुकीची रक्कम ७० कोटी रुपयांहून अधिकवर पोहोचली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित भाऊसाहेब चव्हाणच्या महागडय़ा पाच ते सहा अलिशान मोटारी पोलिसांनी जप्त केल्या. भाऊसाहेबची मेव्हणी भारती मंडलीक शिलेदार हिला अटक करण्यात आली आहे.अडीच ते तीन वर्षांत तिप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखवून केबीसी कंपनीने हजारो नागरिकांवर भुरळ पाडली.