अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणाचा राज्यातील अनेक शहरांत तपास सुरू आहे. आरोपींना घेऊन पोलिसांची दोन पथके वेगवेगळय़ा ठिकाणी रवाना झाली आहेत. मुख्य सूत्रधार शिवाजी कोळी व विनोद पवारला घेऊन वेगवेगळय़ा ठिकाणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
या प्रकरणात औरंगाबाद व श्रीलंका असे दोन वेगवेगळय़ा तक्रारी आहेत. औरंगाबादमध्ये तीन तर, श्रीलंकेत दोघांच्या किडनी काढण्यात आल्या आहेत. औरंगाबाद येथील किडनी प्रकरणात कायद्याची पूर्तता करण्यात आल्याची माहिती असून, श्रीलंकेतील प्रकरण अवैध असल्याचे तपासात समोर आले आहे. औरंगाबाद येथील किडनी प्रत्यारोपणामध्ये विभागीय समितीने प्रकरण नाकारले होते. त्यानंतर राज्यस्तरीय समितीने प्रकरणाला मंजुरी दिल्याची माहिती आहे.