कराड : कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त संशोधनातून सार्वजनिक पृष्ठभागांच्या निर्जंतुकीकरणासाठी ‘नॅनो हर्बल कवच’ निर्माण करण्यात आल्याची माहिती कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुग्णालये, मोठे बझार, विमानतळ, बस व रेल्वे स्थानके अशा सार्वजनिक ठिकाणी स्टेअर ग्रिल, एस्केलेटर, ट्रॉली हँडलच्या स्वच्छतेसाठी साहित्य, कामगारांची कमतरता, अपुरावेळ यामुळे स्वच्छतेचे काम कठीण होते. शिवाय सार्वजनिक ठिकाणी कापड, नॅपकिन्ससह जंतुनाशकाद्वारे केलेले निर्जंतुकीकरण एकदाच पृष्ठभागावरून जंतू काढून टाकू शकते. म्हणून वारंवार स्पर्श केलेल्या सार्वजनिक ठिकाणांची सततची स्वच्छता आवश्यक असते. त्यासाठी एक नवीन जंतुनाशक सूत्र आणि पृष्ठभाग स्वच्छता साधनाची गरज होती. ज्यामुळे किफायतशीर वापरासह अनुकूल, विषाणूविरोधी आणि जंतूंपासून विस्तारित संरक्षण प्रदान करू शकेल. आणि याच गरजा ओळखून कृष्णा विद्यापीठ व सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संशोधनातून ‘नॅनो हर्बल कवच’ हे जंतुनाशक उत्पादन विकसित करण्यात आले आहे.

नॅनोकन आणि हर्बल संयुगांपासून बनवलेले हे संकरित जंतुनाशक विषाणूविरोधी असून, सर्व प्रकारच्या जंतूंपासून पाच तासांपर्यंत विस्तारित संरक्षण प्रदान करते. यातील क्लििनग पॉड सॅनिटाइज्ड होण्यासाठी ग्रिलच्या विविध आयामांमध्ये बसू शकतो आणि पॉडद्वारे नॅनो हर्बल फॉम्र्युलेशन लागू होऊ शकते. पारंपरिक साफसफाईच्या पद्धतींपेक्षा या पॉडचे कमी मनुष्यबळ, सुलभ-सुरक्षित हाताळणी, उच्च अचूकता असे फायदे आहेत. ‘कृष्णा’तील संशोधक डॉ. जयंत पवार, ‘रिसर्च पार्क’च्या डॉ. पूजा दोशी यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत. पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, रिसर्च पार्क फाउंडेशनचे डॉ. अरिवद शाळीग्राम व डॉ. दिनेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत हे उत्पादन नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. याप्रसंगी पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kims and sppu team develops nano herbal kavach for decontamination of surfaces zws
First published on: 19-05-2022 at 02:14 IST