काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सकाळी छापेमारी केली. मात्र ही छापेमारी राजकीय हेतूने केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय. यावरच उत्तर देताना किरीट सोमय्या यांनी कागदपत्रांशिवाय ईडी कारवाई करत नाही असं सांगितलं आहे. याचवेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यासहीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख करत  जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणामध्ये झालेल्या कारवाईचा संदर्भ दिला. यावेळी सोमय्या यांनी संपूर्ण पवार कुटुंब ग्लिसरीन घेऊन रडत होतं, अशी खोचक टीका केलीय.

नक्की वाचा >> ‘कश्मीर फाइल’ रिलीजच होऊ द्यायला नको होता म्हणणाऱ्या पवारांना फडणवीसांनी हसून दिलं उत्तर; म्हणाले, “राष्ट्रवादी…”

“अजित पवारांचा जरंडेश्वर जप्त झाला ना?, न्यायालयाने मान्यता दिली ना? शरद पवार पण रडत होते. ग्लिसरीनची बाटली घेऊन सगळे पवार लाईनमध्ये उभे होते टीव्हीवर. सगळ्या चॅनेलवर. कधी सुप्रिया सुळे रडताना दिसायच्या. कधी त्यांच्या ताई कधी कुणाची माई, कधी कुणाची बायको, कुणाचा मुलगा.. सगळे लाईनीत पवार. सदनभर पवार रडत होते ग्लिसरीनच्या बाटली वापरुन,” असा टोला सोमय्यांनी लगावला. “का ओ? आता न्यायालयाने दिलं ना. अजित पवारांवर बेनामी संपत्तीच्या अंतर्गत पण चौकशी सुरु आहे. तुम्ही लुटणार आणि महाराष्ट्राची जनता बघत बसणार असं होणार नाही,” असंही सोमय्या म्हणाले.

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
MLA chandrakanat Patil is upset as Eknath Khadse will return to BJP
खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंच्या भाषणादरम्यान संजय राऊत, अंबादास दानवे झोपले? भाजपा पदाधिकाऱ्याने शेअर केला VIDEO

नक्की वाचा >> “महाविकास आघाडीचे ९० टक्के आमदार नाराज आहेत असं वाटतं का?” या प्रश्नाला फडणवीस म्हणाले, “यावर मी…”

“हे पाटोळे असो किंवा त्यांचा वकील असो की कोणीही असो, घोटाळा केला कारवाया होणार. उद्धव ठाकरेंचा मेहुणा, उद्धव ठाकरेंची पत्नी, उद्धव ठाकरेंचा मोठा मुलगा आहे, उद्धव ठाकरेंचा छोटा मुलगा आहे. म्हणून त्यांना मनी लॉण्ड्रींग करण्याचा अधिकार नाही मिळत. कारवाया होणार,” असं सोमय्या म्हणाले आहेत. गुरुवारी ते दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

नक्की वाचा >> फडणवीसांविरोधात याचिकेमुळे चर्चेत आलेल्या उके वकिलांविरोधीतील ED च्या कारवाईवर फडणवीस म्हणतात, “२००५ पासून…”

ईडीचे पथक गुरुवारी सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरातील घरी दाखल झाले होते. जमिनीच्या व्यवहारप्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याची माहिती आहे. चौकशीनंतर ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेण्यात आलं आणि आज त्यांना मुंबईत आणण्यात आलंय. कालच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी पत्रकारपरिषद घेत भाजपावर जोरदार टीका केली. “भाजपाचा अत्याचारी व्यवस्थेविरोधात जो कोणी बोलेल त्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून कारवाई केली जाणार आणि तोंड बंद करण्याचं पाप हे भाजपा जाणीवपूर्वक करत आहे.” असा आरोप नाना पटोले यांनी केला.

नक्की वाचा >> महाविकास आघाडीतील ‘या’ दोन मंत्र्यांविरोधातील तक्रार मोदी सरकारने स्वीकारली; सोमय्या म्हणाले, “आजपासून…”

“केवळ सतीश उके यांच्याच प्रकरणात नाही तर अनेक प्रकरणात आपण पाहत आहोत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान, गृहमंत्र्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पुराव्यनिशी माहिती दिली होती, त्यावर का कारवाई केली जात नाही? भाजपा हिटलरशाही करत आहे, या देशात लोकसाही संपुष्टात आणून हुकुमशाही आणत आहे. म्हणून मी मीडियाद्वारे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यालायाचे सरन्यायाधीश यांना विनंती करतो की लोकशाहीला वाचवण्यासाठी हस्तक्षेप करावा, जेणेकरून लोकशाही वाचवण्यात आपल्याला यश येईल. अन्यथा भाजपाच्या हिटरलाशाहीमुळे लोकशाही आता धोक्यात आलेली आहे.” असं देखील नाना पटोले यांनी बोलून दाखवलं आहे.