भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्य सरकारवर आणि मंत्र्यांवर आरोप केले असून त्यासंदर्भात तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या आहेत. यावरून सत्ताधारी आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये अनेकदा कलगीतुरा रंगताना दिसून आला आहे. आता तर किरीट सोमय्या यांनी राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला खुलं आव्हानच दिलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही बाजूंनी टोलेबाजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या हे २६ मार्च अर्थात उद्या भाजपाच्या कार्यकर्त्यांसोबत अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट पाडण्यासाठी जाणार आहेत.

“अनिल परबांचं रिसॉर्ट तुटणार”

अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी किरीट सोमय्या उद्या मोर्चा घेऊन जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकारला धमकी दिली आहे. “पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारने धमक्या द्यायला सुरुवात केली आहे की किरीट सोमय्यांना दापोलीला येऊन देणार नाही. अनिल परब यांचं बेकायदा रिसॉर्ट पाडण्याचा आदेश आल्यानंतरही उद्धव ठाकरे ते पाडत नाहीत. ते पाडण्यासाठी आम्ही उद्या सकाळी मुलुंडहून निघणार आहोत. आम्ही दापोली समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाणार. उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारमध्ये हिंमत असेल, तर आम्हाला अडवून दाखवावं. अनिल परबांचं रिसॉर्ट तुटणारच”, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
mns mla raju patil marathi news
“मनसेच्या मूळ इंजिनमुळे ट्रिपल इंजिन महायुती सरकारला आणखी गती”, मनसेचे आमदार राजू पाटील यांची मिश्किल टिपणी
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

“मला मारायचा तीन वेळा प्रयत्न”

दरम्यान, उद्धव ठाकरे सरकारने मला मारण्याचा तीन वेळा प्रयत्न केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. “उद्धव ठाकरेंची पहिल्या दिवसापासून हीच इच्छा आहे. आत्तापर्यंत शिवसेनेने तीन वेळा गुंड शिवसैनिकांना पाठवून माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्राची जनता माझ्यासोबत आहे. आम्ही पुढे जाणारच”, असं किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.

नंदकिशोर चतुर्वेदी आणि ऑस्ट्रेलिया कनेक्शन

“ठाकरे परिवाराने महापालिकेतल्या घोटाळ्यांचे आणि महावसुलीचे पैसे पांढरे करण्यासाठी नंदकिशोर चतुर्वेदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. कोमो स्टॉप प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे अधिकृत पार्टनर आहे. यांनी आदित्य कुलियन यांच्याकडून ३ कोटी ७८ लाखांचं कर्ज घेतलं. ही कंपनीदेखील नंदकिशोर चतुर्वेदीची आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांचा यात जो पार्टनर आहे त्याचं नाव आहे ल्यूक बेनेडिक्ट. बेनेडिक्टकडून कर्ज घेऊन ठाकरे परिवाराने कोमो स्टॉक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली”, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.