गेल्या काही महिन्यांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांवर सातत्यानं आरोप करण्याचा सपाटा लागला आहे. त्यांच्या आरोपसत्रानंतर शिवसेनेसह राष्ट्रवादीच्याही काही नेत्यांवर ईडीने कारवाई केली. नुकतंच शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्याही मालमत्तेवर ईडीने छापे टाकले. त्यानंतर आज किरीट सोमय्या यांनी खोतकरांवर नवा आरोप केला आहे.

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केलेली असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवा आरोप केला आहे. अर्जुन खोतकर यांनी मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि इमारतीसाठी १०० एकर शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरीट सोमय्या आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याशी संबंधित १०० एकर शासकीय जागा हडपण्याचा घोटाळा सुरू आहे. खोतकरांना मॉल तयार करायचा आहे. कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि बिल्डिंगसाठी ही जागा हवी आहे, असं सोमय्या म्हणाले.

याबद्दल बोलताना सोमय्या म्हणाले, “सरकारने साखर कारखान्यासाठी जागा दिली होती. त्या जागेची किंमत ४०० कोटी आहे. सर्व मिळून २४० एकर जागा आहे. त्याची किंमत १ हजार कोटी आहे. आता ईडीने व्यवस्थित तपास सुरू केला आहे. आयकर विभागालाही त्याची तक्रार केली आहे. आयकर विभागही बेनामी व्यवहाराचा तपास करणार आहे. मुळे आणि तपाडीया परिवार आणि सहआयुक्त नांगरे पाटील यांची पत्नी रुपाली यांचं नावही पुढे येत आहे. मुंबईच्या सहआयुक्तांना मी भेटलो होतो. या घोटाळ्याचा तपास मी सहआयुक्त होण्यापूर्वी बंद केला होता. काहीच घोटाळा नाही, असं या सहआयुक्ताने सांगितलं. एका सहआयुक्तांनी दुसऱ्या सहआयुक्ताला सर्टिफिकेट दिलं, असं ते म्हणाले”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somayya accuses shivsena leader arjun khotkar ed enquiry vsk
First published on: 27-11-2021 at 16:56 IST