शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. अशातच आता किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या सांताक्रुझमधील मालमत्तेची पाहणी केली होती. त्यामुळे सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबद्दल आता किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गुन्हा दाखल झाल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी स्वतःच ट्वीट करत दिली आहे. त्यानंतर टीव्ही ९ शी बोलताना सोमय्या म्हणाले, “पॅन्डेमिक अॅक्टअंतर्गत माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. पण माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही आणि मी असं काही केलेलं पण नाही. ४ सप्टेंबरला छगन भुजबळांची बेनामी प्रॉपर्टी जप्त झाली. त्यानंतर मी भुजबळ सध्या जिथं राहतात सांताक्रूझला त्या ९ मजली घराची पाहणी करायला गेलो. तेपण लांबून..कारण मला पोलिसांनी अडवलं आणि याच्या पुढे जायचं नाही असं सांगितलं. त्या वेळची नोटीस आत्ता पाठवलीये. त्यावेळी नियमांचं भंग झाला वगैरे असं काय काय त्यामध्ये लिहिलेलं आहे”.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – संजय राऊतांचा सोमय्यांवर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; पण फडणवीसांना क्लीन चिट, म्हणाले, “आपल्या मागे…”

ही नोटीस का पाठवली हे सांगताना किरीट सोमय्या म्हणाले, “आता उद्धव ठाकरेंचे १९ बंगले पायाखाली आले म्हणून आत्ता नोटीस पाठवली आहे. पण ठीक आहे संजय राऊतांना भीती वाटणं साहजिक आहे. त्यांचा पार्टनर सुजीत ईडीकडे जाऊन येऊन आहे. तो काय सांगेल बोलेल याबद्दल माहिती नाही. प्रवीण राऊत जेलमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना भीती वाटणारच. पण ठीक आहे आता पोलिसांची नोटीस आलीये त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही जाणार. आजची ही १८ वी केस आहे. हवे तेवढे गुन्हे दाखल करा पण मी घोटाळेबाज ठाकरे सरकारला उघडं पाडणार”.

Story img Loader