उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकताच उद्धव ठाकरे यांचा चेहरा आठवत असल्याचं वक्तव्य केलं होतं. यानंतर आता शिवसेना नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना गाण्यातूनच प्रत्युत्तर दिलंय. या गाण्यात पेडणेकरांसह महिला शिवसैनिकांनी फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रीपदावर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी शिवसैनिक आहे. मी गाणं म्हणेल त्यातच तुम्हाला कळेल की कुणाच्या नशिबाची थट्टा कुणी मांडली, असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी एक गाणं म्हटलं.

पेडणेकरांनी गायलेल्या गाण्याचे बोल

एक होता निर्मळ माणूस
देवेंद्र त्याचे नाव
मुख्यमंत्रीपदासाठी कटकारस्थानं केली
त्यांना एका अमृताची दृष्ट लागली हो
त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रीपद आले आहे हो
कशी नशिबाने थट्टा आज मांडली

हेही वाचा : ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ गाणं ऐकताच कोणाचा चेहरा समोर येतो? अमृता फडणवीस म्हणाल्या “उद्धवजी…”

अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या होत्या?

अमृता फडणवीस ‘झी मराठी’वर ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यात त्यांना ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकल्यावर कोणाचा चेहरा समोर येतो? असा प्रश्न सुत्रसंचालक सुबोध भावे अमृता यांना विचारला होता. यावर त्या म्हणाल्या, “उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान आणि सन्मान. पण हे गाणं ऐकल्याबरोबर मला त्यांचाच चेहरा आठवला.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishori pednekar answer amruta fadnavis over criticism of uddhav thackeray through song pbs
First published on: 07-08-2022 at 19:02 IST