“सरकार पडू दे, मग तुला मारू”, किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी; पत्रात अजित पवारांचंही नाव!

“आत्ता लेखी लिहून पाठवतोय. सरकार पडू दे.. नंतर तुला जीवे मारू. ते पत्रही मीच पाठवलं होतं. तुला जे करायचं ते कर. उद्धव ठाकरेंना सांग”, असं या पत्रात म्हटलं आहे.

kishori pednekar life threat letter
किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र, पत्रात अजित पवारांचंही नाव!

महाराष्ट्रात एकीकडे राजकीय उलथापालथ होत असताना दुसरीकडे मुंबईच्या महापौरी किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे पेडणेकरांना ही धमकी आली असून या पत्रावर संबंधित व्यक्तीचं नाव, पत्ता देखील नमूद करण्यात आला आहे. या पत्राची आपण गांभीर्याने दखल घेतली असून त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणार असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींसोबतच आता या धमकी पत्राची देखील चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे या पत्रामध्ये?

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष मिळून ५० आमदार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात असताना किशोरी पेडणेकर यांना ही धमकी आली आहे. “मी विजेंद्र म्हात्रे.. जय महाराष्ट्र सायबर कॅफे, महाराष्ट्र बँक, उरणमधून बोलतोय. आत्ता लेखी लिहून पाठवतोय. सरकार पडू दे.. नंतर तुला जीवे मारू. ते पत्रही मीच पाठवलं होतं. तुला जे करायचं ते कर. उद्धव ठाकरेंना सांग”, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ –

Maharashtra Political Crisis Live : “आम्ही शेवटपर्यंत लढणार, कायद्याचं पालन झालं तर..”, संजय राऊतांचा घणाघात

पत्रात अजित पवारांच्या नावाचा उल्लेख

दरम्यान, या पत्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही नावाचा उल्लेख करण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “आमच्या अजित पवारांच्या जिवावर मुख्यमंत्री झाला आहेस. जास्त माज करू नकोस असं उद्धव ठाकरेला सांग”, असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kishori pednekar recieved life threat letter on eknath shinde rebel mla supreme court pmw

Next Story
आदित्य ठाकरे म्हणाले ‘खरे शिवसैनिक असाल तर…’; एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; आसामला ५१ लाखांची मदत जाहीर
फोटो गॅलरी