Video : अवघ्या चार तासांमध्ये मुंबई ते नागपूर व्हाया बुलेट ट्रेन… पाहा हा प्रकल्प नक्की आहे तरी कसा

मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन झाल्यास अवघ्या चार तासांत मुंबईहून नागपूरला पोहोचणं शक्य होणार आहे.

mumbai nagpur bullet train
मुंबई ते नागपूरदरम्यान होणारा बुलेट ट्रेन प्रकल्प हा ७६६ किलोमीटर लांबीचा असणार आहे.

महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. २०२२ च्या अखेर पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करून नागरिकांचा प्रवास सुखकर करण्याचा सरकारचा मानस आहे. हे अंतर अधिक वेगाने कापण्यासाठी प्रवाशांच्या सेवेत मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन आणण्याचा विचारात सरकार आहे. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प कसा असेल आणि या प्रकल्पामुळे किती फायदा होईल, याबद्दल जाणून घेऊया व्हिडीओच्या माध्यमातून.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन २०२३ च्या अखेरीस धावणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु जमीन अधिग्रहण करण्यात अडचणी येत असल्यामुळे ही बुलेट ट्रेन रुळावर येण्यासाठी २०२८ उजाडणार आहे. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प नागरिकांसाठी सोयीचा असला तरी यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Know all about mumbai nagpur bullet train project kak

ताज्या बातम्या