राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, शिंदे गटातील कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं? वाचा…

शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. यात शिंदे गटातील कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळालं याचा हा आढावा.

राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, शिंदे गटातील कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं? वाचा…
शिंदे फडणवीस सरकार मंत्रीमंडळ विस्तार व बंडखोर शिंदे गट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग ठेवले आहेत. याशिवाय शिंदे गटातील नऊ मंत्र्यांनाही वेगवेगळी खाती दिली आहेत. शिंदे गटातील कोणत्या नेत्याला नेमकं कोणतं खातं मिळालं आहे याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. त्यानिमित्ताने या खातेवाटपाचा हा आढावा.

एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणती खाती?

एकनाथ शिंदे – मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

शिंदे गटातील मंत्र्यांकडे कोणती खाती?

१. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता

२. दादा भुसे – बंदरे व खनिकर्म

३. संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन

४. संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन

५. उदय सामंत – उद्योग

६. तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

७. अब्दुल सत्तार – कृषी

८. दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा

९. शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Know which minister of shivsena rebel eknath shinde group get which ministry in shinde fadnavis government pbs

Next Story
मोठी बातमी! एकनाथ शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? वाचा संपूर्ण यादी!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी