– विनायक डिगे

जागतिक तापमान वाढीमुळे सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. परिणामी, उन्हाचा तडाखा वाढत आहे. मागील काही वर्षांपासून तापमानात होत असलेल्या वाढीचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. तापमानवाढीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. शेती, उद्योगांबरोबरच देशाच्या आर्थिक उत्पन्नावरही परिणाम होताना दिसत आहे. अलीकडे खारघरमधील दुर्दैवी घटनेमुळे उष्माघाताचे विपरीत परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
rising mortality rates in young adults post-corona in america
करोनानंतर अमेरिकेत तरुणांच्या मृत्यूदरात वाढ
Health Infectious Diseases Climate Change Health news
आरोग्य: भय इथले संपत नाही…
India Climate Change Inflation Agriculture Farmers
व्यवसायाभिमुख पिके हवीत!
nashik gas leakage latest news in marathi
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!

२००४च्या तुलनेत २०२१पर्यंत मृतांमध्ये ५५ टक्क्यांनी वाढ

२००० ते २००४ आणि २०१७ ते २०२१ या चार वर्षांची तुलना केल्यास भारतामध्ये उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये ५५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे ‘लॅन्सेट आरोग्य आणि हवामान बदल’ या सर्वेक्षणातून आढळून आले आहे. जागतिक स्तरावर २०००-२००४ मध्ये ६५ वर्षांवरील एक लाख ९० हजार नागरिकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला, तर २०१७-२०२१ या काळात हे प्रमाण वाढून तीन लाख १० हजारांवर पोहोचले. भारतात २००० ते २००४ या काळात ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २० हजार व्यक्तींचा, तर २०१७ ते २०२१ मध्ये ३१ हजार व्यक्तींचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. इतर देशांबरोबरच भारतामध्येही २०२१-२२ मध्ये विक्रमी तापमानाची नोंद झाल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. संशोधकांच्या मते, अतिउष्णतेच्या संपर्कात आल्याने आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यामुळे हृदय, रक्तवाहिन्या आणि श्वसनाशी संबधित आजार होतात. बदलत्या हवामानामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात यंदा ३५७ संशयित रुग्ण

महाराष्ट्रातही मागील दोन महिन्यांमध्ये उष्माघाताचे ३५७ संशयित रुग्ण, तर एक निश्चित रुग्ण आढळला आहे. राज्यात मुंबई उपनगरामध्ये सर्वाधिक ७२, त्याखालोखाल नंदुरबार ६४, यवतमाळ ४६, उस्मानाबाद ३३, वर्धा २९ आणि लातूरमध्ये २६ संशयित रुग्ण सापडले आहेत. तर साताऱ्यामध्ये एक उष्माघाताचा निश्चित रुग्ण सापडला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत राज्यात अद्याप उष्माघातामुळे एकाच्याही मृत्यूची नोंद झाली नव्हती. मात्र खारघर येथे घडलेल्या घटनेने राज्यात उष्माघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

उष्णतेच्या लाटांमुळे आणीबाणी…

हवामान बदलामुळे जागतिक तापमान आणि उष्णतेच्या लहरींची वारंवारिता व तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून उष्माघाताचे रुग्ण वाढत आहेत. उष्णतेच्या लाटा अनेकदा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये आणीबाणीच्या परिस्थितीसाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याबरोबरच सामाजिक-आर्थिक बाबींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी, आरोग्य सेवेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेकदा उष्णतेच्या लाटेसह वीज-टंचाई, आरोग्य सुविधा, वाहतूक आणि पाण्याच्या पायाभूत सुविधांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

क्रयशक्तीवर परिणाम…

दुपारच्या वेळी उन्हामध्ये फिरल्याने उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांचा घराबाहेर पडण्याकडे कल कमी असतो. त्यामुळे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक घरातून बाहेर पडणे टाळतात. तसेच कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांच्या कामावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. यामुळे कामाचे तास मोठ्या प्रमाणात वाया जाण्याच्या घटना घडत आहेत. भारतीयांनी २०२१ मध्ये १६७.२ अब्ज कामाचे तास वाया घालवले आहेत.

हेही वाचा : बहुतांश ठिकाणी पारा चाळिशीपार; अंगाची काहिली, घामाच्या धारा

उष्माघाताचे दोन प्रकार…

उष्माघाताचा त्रास साधारणपणे दोन प्रकारे होतो. परिश्रमाअभावी उष्माघात आणि परिश्रमात्मक उष्माघात असे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारामध्ये वातावरणातील तापमान वाढल्याने त्रास होतो. तर दुसऱ्या प्रकारात अती श्रमामुळे शरीरातील तापमान वाढल्याने उष्माघात होतो. वातावरणातील तापमान वाढल्यामुळे परिश्रमाअभावी उष्माघात होतो. वातावरणातील तापमान वाढल्यावर शरीरातील तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा कार्यान्वित होते. ही यंत्रणा पाणी घामाद्वारे बाहेर टाकून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते. मात्र या कालावधीत शरीराला पाण्याचा पुरवठा न झाल्यास ठरावीक वेळेनंतर ही यंत्रणा शरीरातील पाणी घामाद्वारे बाहेर टाकणे बंद करते. त्यामुळे शरीरातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाते.

शरीराचे तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा ठप्प झाल्याने श्वसनाचा त्रास सुरू होतो. यावेळी संबंधित व्यक्तीचा रक्तदाब कमी होतो, उलटी व चक्कर येते, त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागते. त्यानंतर शरीरातील मेंदू, मूत्रपिंड, हृदय असे अवयव बाधित होण्यास सुरुवात होते. तर परिश्रमात्मक उष्माघातामध्ये वातावरणातील तापमान साधारण असते. यावेळी संबंधित व्यक्ती व्यायाम किंवा दूरचा प्रवास करीत असेल, तर शरीरातील तापमान वाढते. यामुळेही उष्माघाताचा त्रास होतो.

Story img Loader