Devgad Nagar Panchayat Election Result: शिवसेनेकडून राणेंना मोठा धक्का; नितेश राणेंच्या हातून गेली सत्ता

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांना धक्का देणारा निकाल

nitesh rane
या नगरपालिकेमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीय

महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडलेल्या भंडारा आणि गोंदियामधील जिल्ह्यातील परिषदांच्या २३ व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठी निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेकांसोबत चुरशीची लढाई असतानाच प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. असं असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांना धक्का देणारा निकाल समोर आलाय.

देवगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये नितेश राणेंच्या हातून सत्ता गेलीय. देवगड नगरपंचायत मध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. भाजपाची सत्ता असणाऱ्या या नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला आठ व भाजपाला आठ अशा समसमान जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी आठ उमेदवार निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आल्याने या ठिकाणी नक्की सत्ता कोणाची यावर शिक्कामोर्तब निकाल लागल्यानंतरही झालेलं नाही.

नक्की वाचा >> कवठेमहांकाळमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर रोहित पाटलांची पहिली प्रतिक्रिया, काढली आबांची आठवण, म्हणाले..

निकालाच्या या सर्व धावपळीत पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देवगड येथे दाखल झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

नक्की वाचा >> Nagar Panchayat Election Result 2022: धनंजय मुंडेंना धक्का दिल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या “ही लढत मुंडे विरुद्ध मुंडे…”

आज निकाल लागत असणाऱ्या निवडणुकीमध्ये राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी आणि १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ जागांसाठी मंगळवारी मतदान झालं. या सर्व ठिकाणच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kokan sindhudurg devgad nagar panchayat election result narayan rane son nitesh rane loses the power scsg

Next Story
“सत्ता असूनही यश मिळवण्यात कमी पडले”; निकालानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या “ही लढत मुंडे विरुद्ध मुंडे…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी