सेवानिवृत्तीनंतरच्या लाभाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असताना वैद्यकीय अधिकारी रंगेहात पकडला गेला. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. अशितोष तराळ (वय ३८, रा. मलकापूर मूळ कुरुंदवाड) याच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

यातील तक्रारदार हे आज सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांचा प्रस्ताव पुणे कार्यालयाकडून मंजूर होऊन आल्यानंतर तदनंरची कारवाई करण्यासाठी तसेच इतर प्रलंबित पुरवणी देयके विना त्रुटी पुढे पाठवण्यासाठी पाच हजार रुपये व वरिष्ठांच्या सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभ करिता सात हजार रुपये अशी १२ हजार रुपये लाचेची मागणी डॉ. तराळ यांनी केली होती. यानंतर सेवानिवृत्तीच्या कामातील पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारत असताना तराळ यांस रंगेहात पकडण्यात आले, असे पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत
mumbai high court, state government, physically disabled persons
मुंबईतील अपंगस्नेही पदपथांचे प्रकरण : कायद्यांची पुस्तके कपाटात रचण्यासाठी आहेत का ? उच्च न्यायालयाचे खडेबोल