scorecardresearch

कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा व यानुषंगाने अन्य बाबींबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक घेण्यात येईल, असे पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आज (शनिवार) कोल्हापुरमध्ये सांगितले.

मंत्री तटकरे यांनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन मंदिर परिसर, किरणोत्सव संबंधित अडथळे, चाचणी संदर्भात पाहणी केली. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, अन्नछत्र, भक्त निवास व्यवस्थेविषयी माहिती घेतली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील , माजी स्थायी सभापती आदिल फरास उपस्थित होते.

पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत –

माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. समाज माध्यमांचा वापर वाढला असला तरीही वृत्तपत्रांचे स्थान कायम आहे. वृत्तपत्र वाचून दिवसाची सुरुवात करणारा मोठा वर्ग आहे. वृत्तपत्रांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभाग प्रयत्नशील आहे. ३० वर्षे पत्रकारिता केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच पत्रकारांना सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी प्रयत्न असून निधीची तरतूद केली आहे. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kolhapur a meeting will be held with the deputy chief minister regarding the mahalakshmi temple development plan msr

ताज्या बातम्या