राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांची चुल पेटवण्याची जबाबदारी भाजपा घेत आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी आज चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी यांनी भेट दिली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शिधा वाटप करण्यात आला.
हा संदर्भ घेऊन चंद्रकांत पाटील यांनी संपात उतरलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना संप सुरू असेपर्यंत शिधा देण्याची जबाबदारी भाजपा घेत असल्याचे घोषित केले. हा संप लवकरच संपुष्टात यावा, कर्मचाऱ्यांनी स्वाभिमानाने कामावर जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपुष्टात आणण्यात राज्य शासन अपयशी ठरत असल्याबद्दल आमदार पाटील यांनी टीकेची झोड उठवली. ” राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता आल्यापासून हैदोस सुरू आहे. यांचे काही तरी नक्की होणार. अंबाबाई जागी होईल आणि काहीतरी चांगले करेल ” असे साकडे त्यांनी देवीला घातले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur bjp will provide rations to the protesters till the strike of st workers ends msr
First published on: 16-01-2022 at 17:29 IST