घराच्या वादावरून झालेल्या मारहाण प्रकरणी न्यायालयाने आज (शनिवार) १० जणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी गायत्री उर्फ राणी गणेश गुरव (वय २३, रा. मुदाळ,ता. भुदरगड) यांनी फिर्याद दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राणी गुरव यांचे आजोबा निवृत्ती गुरव यांनी गावातील वडिलोपार्जित घर आरोपी अशोक गोविंदराव पाटील यांना विकल्याच्या कारणावरून दिवाणी न्यायालयात खटला सुरू होता. यावरून चिडलेल्या आरोपींनी फिर्यादीच्या घरात घुसून २५ नोव्हेंबर २०११ रोजी मारहाण केली होती. याप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. अतिरिक्त सरकारी वकील ए . एम. पिरजादे यांनी युक्तिवाद केला होता. सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्या. बी. डी. शेळके यांनी आरोपींना पाच कलमान्वये प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी व अन्य एका कलमान्वये प्रत्येकी सहा महिने सक्तमजुरी तसेच साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur elderly man beaten over domestic dispute 10 sentenced to rigorous imprisonment msr
First published on: 29-01-2022 at 18:37 IST