scorecardresearch

Gokul Milk Rate Hike : गोकुळच्या दूध दरात वाढ, गायीचं दूध किती महागलं? वाचा नवे दर…

कोल्हापूरच्या गोकुळ या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने आपल्या दुधाच्या दरात पुन्हा वाढ केली आहे.

Golul Milk 2
गोकुल मिल्क (सौजन्य – गोकूळ संकेतस्थळ)

कोल्हापूरच्या गोकुळ या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने आपल्या दुधाच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. या नव्या निर्णयानुसार, गोकुळच्या गायीच्या दुधामध्ये प्रति लिटर तीन रुपयांची आणि अर्धा लिटर दूध पिशवीच्या दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीसह आता गोकुळच्या दुधाचे दर प्रतिलिटर ५४ रुपये झाले आहेत.

गोकुळ दूध संघाने गायीच्या दूध केलेली ही दरवाढ मागील तीन महिन्यात दुसरी वाढ आहे. हिवाळ्यात घटलेल्या दुधाच्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर गोकुळने २७ ऑक्टोबरला गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केली होती. तेव्हा खरेदीत वाढ केली होती, मात्र विक्रीत वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, त्यामुळे मागील काही काळात दूध संघाला तोटा सहन करावा लागत असल्याचं सांगत गोकुळच्या संचालक मंडळाने अखेर विक्रीसाठीही दर वाढवले.

हेही वाचा : Goat Milk Benefits: गायीच्या दुधापेक्षाही बकरीचे दूध आहे सर्वोत्तम! बकरीच्या दुधाचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचून तुम्हीही व्हाल चकित!

गोकुळने वाढवलेले हे नवे दूध दर सोमवारी (५ डिसेंबर) मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू झाले. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि पुणे या भागांसाठी ही दरवाढ आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 13:59 IST