करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या पुनप्रतिष्ठापना त्रिशताब्दीनिमित्त महालक्ष्मीसाठी सुवर्णपालखी बनवली जाणार आहे. ३५ किलो शुद्ध सोन्यापासून बनवल्या जाणाऱ्या या पालखीसाठी १५ कोटी रुपये खर्च होणार असून त्यासाठी निधीसंकलन करणार असल्याची घोषणा खासदार धनजंय महाडिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
भाविकांच्या सहकार्यातून ही पालखी पूर्ण करण्याची संकल्पना आहे. या पालखीबरोबरच सोन्याचे मोच्रेल, सोन्याच्या चावऱ्या, सुवर्ण कलशांकीत सूर्य, चंद्र, अबदागिऱ्याही बनवण्याची संकल्पना आहे. निधीसंकलनासाठी कार्यकारी मंडळ, निमंत्रित मंडळ, सल्लागार मंडळ, कारागीर मंडळ यांची स्थापना केली जाणार आहे, असे महाडिक म्हणाले.

“२४ डिसेंबरनंतर पश्चाताप…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा; म्हणाले, “फडणवीसांना पुन्हा उघडे…”