कोल्हापूर : बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून खून!

या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले

Murder of 3 month old girl by a third party for refusing to give money coconut and sari
( प्रातिनिधीक छायाचित्र)

कोल्हापूर जिल्ह्यातील खोची (ता. हातकणंगले) येथील एका बेपत्ता झालेल्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून, तिचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
अत्याचार करणाऱ्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या क्रुर घटनेमुळे खोची गाव व परिसरात नागरीकातून संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, आज दुपारी १२ वाजेपासून खोची गावातून एक सहा वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. वडील, कुटुंबीय शोध घेत होते. सोशल मीडियावर मुलगी हरवल्याचा मेसेज देखील व्हायरल करण्यात आला होता.

दरम्यान, दुपारी चार वाजेच्या सुमारास कब्रस्तानमध्ये एका झाडाखाली एका मुलीचा  मृतदेह आढळून आला. तिच्या अंगावर मारहाण केल्याचे व्रण दिसत होते. तिच्यावर अत्याचार करुन गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

या प्रकरणी एका संशयीतास पेठवडगांव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहीती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, डीवायएसपी रामेश्वर वैंजाने यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे पुढील तपास करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kolhapur murder of a missing six year old girl msr

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या