scorecardresearch

कोल्हापूर : मोक्का लावण्याची धमकी देणाऱ्या पोलिसांना १० लाखांची लाच घेताना अटक

१० लाखाची लाच घेताना गुन्हे अन्वेषण विभागाचे दोन पोलीस जाळ्यात सापडले आहेत

Kolhapur Police arrested for accepting bribe of Rs 10 lakh

संघटित गुन्हेगारीच्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची भीती दाखवून २५ लाखाची लाच मागणी करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या दोन पोलिसांना शुक्रवारी रंगेहात पकडण्यात आले. १० लाख रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विजय कारंडे व किरण गावडे अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत. गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी असणारे पोलीसच लाच प्रकरणात अडकल्याने त्यावर समाज माध्यमात चर्चा होत असून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

तक्रारदार दत्तात्रय जाधव हे वकील आहेत. त्यांचा मुलगा जुन्या अत्याधुनिक बनावटीच्या दुचाकी (स्पोर्ट्स बाईक) विक्रीचा व्यवसाय करतो. त्यांनी चोरीच्या दुचाकी आणून विक्री केली या संशयावरून त्याला कारंडे व गावडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात १९ जानेवारी रोजी दिवसभर बसवले होते. त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करु असे सांगून २५ लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

तक्रारीनंतर कारंडे व गावडे यांनी लाचेची मागणी केल्याचे दिसून आल्यावर सापळा रचण्यात आला. शुक्रवारी पोलीस अधिक्षक कार्यालयाला लागूनच असलेल्या ठिकाणी दोघांना १० लाख रुपये लाच स्वीकारत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांविरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kolhapur police arrested for accepting bribe of rs 10 lakh abn

ताज्या बातम्या