कोल्हापूर महापालिकेमध्ये पक्षाचा महापौर करण्यासाठी एकेका नगरसेवकाला ३५ लाख रुपये दिले होते, असा गौप्यस्फोट जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांनी रविवारी केला. तर, या वर्तणुकीमुळे आपल्यातच राजकीय तिरस्काराची भावना निर्माण झाली, असंही त्यांनी बोलून दाखवलं.

वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी एकत्रित येत आघाडीची घोषणा केली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वसमावेशक संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला सर्व घटकांनी साथ द्यावी, असे आवाहन कोरे यांनी केले.

kolhapur mla prakash awade, claim on hatkanangale lok sabha seat
“मी महायुतीचाच! मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लढणार”, बंडखोर आमदार प्रकाश आवाडे यांचा पवित्रा
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Sanjay Mandlik
नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना खासदार करूया; हसन मुश्रीफ यांचे आवाहन
Blood donation by AAP
केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे रक्तदान

कोल्हापुरात नुकतीच विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही असाच प्रयत्न सुरू आहे. निवडणुका बिनविरोध करण्यामागची भूमिका काय? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर कोरे म्हणाले, “मर्यादित मतदार असलेल्या विधान परिषदेसारखी निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न मी केला. निवडणुकीचे पावित्र्य जपले जावे असा यामागे हेतू होता. कोल्हापूरमध्ये पूर्वी पक्षाचा महापौर करण्यासाठी एकेका नगरसेवकाला ३५ लाख रुपये दिले होते, यामुळे लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. राजकीय तिरस्काराची भावना निर्माण झाली. हेच प्रकार करत बसणे योग्य ठरणार नाही.”

ती तर ईश्वरी कृपा –

“निवडणूक म्हटली की अनेकांना ती लढवण्याची इच्छा होते. त्यातून ईर्षा वाढीस लागते. याऐवजी समन्वय ठेवून निवडणूक बिनविरोध झाली, तर ते अधिक उपयुक्त ठरणार आहे. कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक ही ईश्वरी कृपेने बिनविरोध झाली. मानवी प्रयत्नांनी ते शक्य नव्हते.”, असेही त्यांनी विधान बोलून दाखवले.

जिल्हा बँक निवडणूक अटळ ?

याचबरोबर, “कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी संवाद सत्र सुरू ठेवले आहे. प्रत्येक घटकाचा सन्मान ठेवला तर पुढे जाणे शक्य आहे. मात्र निवडणूक बिनविरोध होईल असे निश्चितपणे म्हणता येणार नाही.”, असाही उल्लेख करीत निवडणूक अटळ असल्याचे कोरे यांनी अधोरेखित केले.