शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत असल्याने यड्रावकर यांच्या समर्थनार्थ जयसिंगपूर येथे शेकडो समर्थक एकवटले आहेत.

राज्यातच्या बदलत्या राजकारणात शिरोळ तालुक्याचे अपक्ष आमदार, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने त्यांना मंत्रिपद गेले पण ते शिंदे यांच्यासोबत गेल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्यांनी मंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली
gulabrao patil
चावडी: बाळासाहेब भवन की ?

तर यड्रावकर यांच्या समर्थकांनी शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यासाठी रस्त्यावर उतरून प्रतित्तुर देण्याचे ठरवले आहे. राजेंद्र पाटील-यड्रावकर हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. नंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला. अपक्ष आमदार असल्याने ते कोणाच्या जायचे याचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना कोणी आव्हान करू नये, असे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यातून त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली जात होती. त्या निमित्ताने या गटाने आज शक्तिप्रदर्शन केले आहे.

जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर ६ येथे असणाऱ्या यड्रावकर यांच्या कार्यालयाकडे येणारे सर्व मार्ग पोलिसांनी बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत. दरम्यान शिरोळ तालुक्यासह परिसरातील यड्रवकर समर्थक संख्येने एकवटले आहेत. या ठिकाणी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.