कोकण रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे यूटिव्ही मशिन रत्नागिरीजवळ रुळावरुन घसरले.

(संग्रहित छायाचित्र)

कोकण रेल्वेवरील वाहतूक मंगळवारी सकाळी विस्कळीत झाली असून विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे मशिन रत्नागिरीजवळ रुळावरुन घसरले. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईवरुन येणाऱ्या गाड्यांचा काही काळ खोळंबा झाला होता. ऐन सुट्टीच्या कालावधीत वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.

विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे यूटिव्ही मशिन रत्नागिरीजवळ रुळावरुन घसरले. यामुळे सुमारे दीड तास कोकण रेल्वेवरील वाहतूक ठप्प होती. भोके गावाजवळची ही घटना घडली. दुपारी दोनच्या सुमारास या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु झाली.  या मार्गावरील अनेक गाड्या विलंबाने धावत असून कोकण रेल्वेवरील प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरु असून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असते. अशा परिस्थितीत कोकण रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Konkan railway utv derailed near ratnagiri express train service disrupted