नगर : विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याने कोपर्डी (ता. कर्जत) येथील दलित तरुणाने आत्महत्या केली, यासंदर्भात तीनपैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बंटी बाबासाहेब सुद्रिक व वैभव मधुकर सुद्रिक अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. आणखी एका आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. सध्या कोपर्डी गावात शांतता असून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी ही माहिती दिली. या गुन्ह्याचा तपास वाखारे करत आहेत. या घटनेने कोपर्डी गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सन २०१६ मध्ये कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेने देश पातळीवर प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

75 customers cheated over rs 66 crore in the name of giving flats in housing project at Sion
सदनिकेच्या नावाखाली ७५ जणांची ६६ कोटींची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल
injured bull
माथेफिरुने केलेला कुऱ्हाडीचा घाव पाठीत वर्मी बसला, गावभर फिरस्ती अन् माणुसकी मदतीला धावली
Anant Radhika Wedding
अंबानींच्या लग्नात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिल्याप्रकरणी अभियंत्याला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
Petition, Rahul Gandhi,
राहुल गांधी, उद्धव ठाकरे, राऊत यांच्या विरोधात याचिका; मतदान यंत्राबाबत खोट्या, दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा दावा
day after kathua terror attack massive search operation on to track down terrorists
दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम; हेलिकॉप्टरसह मानवरहीत हवाई पाळत
Why did the NASA astronauts who went to the space station including Sunita Williams not return What are the problems facing them
सुनिता विल्यम्स यांच्यासह अंतराळ स्थानकात गेलेले नासाचे अंतराळवीर का परतले नाहीत? त्यांच्यासमोर काय अडचणी आहेत?
Thane Citizens, Thane Citizens Protest Aggressive Bike Towing, Police Seek Rule Adherence, thane news,
टोईंग कारवाईच्या त्रासामुळे ठाणेकर हैराण ठाण्यातील सुजान नागरिकांचे टोईंगविरोधात आंदोलन, जागोजागी जनजागृती
kalyan, Feeding Stray Dogs, Dog Loving Woman Threatened in kalyan, Dog Loving Woman Threatened with Death , Feeding Stray Dogs in kalyan, kalyan news, marathi news,
कल्याणमध्ये श्वानप्रेमी महिलेला नागरिकाची मारण्याची धमकी

हेही वाचा… Maharashtra News Live Updates : “महाराष्ट्रात भाजपासाठी भावनिक वातावरण”, पंतप्रधान मोदींचा दावा, यासह महत्त्वाच्या बातम्या

दोन दिवसांपूर्वी कोपर्डी गावातील तमाशामध्ये नाचण्याच्या कारणावरून विठ्ठल उर्फ नितीन कांतीलाल शिंदे (३७) याला तिघांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर गोंधळ निर्माण होऊन तमाशा बंद पडला. नितीन घरी परतत असताना रस्त्यात त्याला तिघांनी अडवले व गावातील स्मशानभूमीमध्ये नेत त्याला विवस्त्र केले, मारहाण केली, त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला.

दुसऱ्या दिवशी त्याने घरी निरोप पाठवून कुटुंबीयांकडून कपडे मागून घेतले व नंतर तो घरी आला. या घटनेमुळे नैराश्य आलेल्या नितीनने दुसऱ्या दिवशी, गुरुवारी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने घडलेल्या घटनेसंदर्भात चिठ्ठी लिहिली होती.

हेही वाचा… कोपर्डीमध्ये दलित तरुणाची आत्महत्या; विवस्त्र करून मारहाणीनंतर टोकाचे पाऊल

यासंदर्भात नितीनचे वडील कांतीलाल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनेश उर्फ बंटी बाबासाहेब सुद्रिक, स्वप्निल बबन सुद्रिक व वैभव मधुकर सुद्रिक (तिघेही रा. कोपर्डी, कर्जत) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील दोन आरोपींना रात्रीच अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयापुढे हजर केले जाईल.