scorecardresearch

“२०२४ मध्ये मोदींचं सरकार येईल आणि आपण…”, खासदार कुमार केतकरांनी काँग्रेसच्या लेट लतिफ नेत्यांचे कान टोचले

काँग्रेसने डोंबिवलीत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते तब्बल दोन ते अडीच तास उशिराने पोहोचले.

Kumar Ketkar Nana Patole
कुमार केतकर – नाना पटोले

डोंबिवली काँग्रेसने हात जोडो अभियान तसेच एका पुरस्कार कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह स्थानिक नेते मंडळी तब्बल अडीच तास उशिरा पोहोचली. या कार्यक्रमास खासदार कुमार केतकर हे देखील उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होताच कुमार केतकर यांनी लेट लतिफ नेत्यांचे कान टोचले. यावेळी बोलताना केतकर यांनी काँग्रेस पक्ष हा पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांचा पक्ष आहे आणि हे दोन्ही नेते कुठल्याही कार्यक्रमाला कायम वेळेवर पोहोचायचे.

केतकर म्हणाले, पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींची लोकप्रियता नक्कीच नाना पटोले आणि कुमार केतकर यांच्यापेक्षा जास्त होती तरीदेखील ते प्रत्येक ठिकाणी वेळेवर यायचे. त्यामुळे याच्यापुढे कायम वेळ पाळावी लागेल. नाहीतर २०२४ मध्ये मोदींचं सरकार येईल आणि त्याच्यानंतर आपण दोन तासांनी पोहोचू. असे बोलतं खासदार कुमार केतकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि स्थानिक नेत्यांचे कान टोचले.

हे ही वाचा >> “उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांचा सल्ला पाळावा, माझाही पाठिंबा”; रामदास आठवलेंचं वक्तव्य

खासदार कुमार केतकर म्हणाले, २०१४ ला असा टाईम टेबलचा घोटाळा करून चालणार नाही. २०२४ ची निवडणूक आपल्याला जिंकायची असेल तर आपल्याला आजपासून दररोज टाईम टेबल पाळावं लागेल. ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या शपथा घेतल्या ते सगळे काँग्रेस पक्ष सोडून गेले. आपल्यापैकी कोणी सोडून गेलं नाही, आपल्या कोणाच्याही घरी ईडी, सीबीआयवाले आले नाहीत कारण आपण काही केलेलं नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 10:53 IST

संबंधित बातम्या