Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Date Announced : महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे. या योनजेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आहेत. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे. आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केल जाणार आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण येत्या २९ सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे. महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. म्हणजेच येत्या २९ सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या (अर्जदार) खात्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये जमा होतील.

दरम्यान, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज अद्याप भरलेला नाही, त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Ladki Bahin Yojana December
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी सुधारणार; रविवारी साध्य योग जुळल्याने १२ राशींना काय मिळणार?
Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana
Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार? आदिती तटकरे म्हणाल्या…
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली, केव्हापर्यंत करता येणार अर्ज? आदिती तटकरे म्हणाल्या…
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
The Golden Road: How Ancient India
China Silk Road weapon: चीनकडून ‘सिल्क रोड’ या ऐतिहासिक संकल्पनेचा शस्त्रासारखा वापर; भारतीय इतिहासकार कुठे चुकले?
Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारला, पण पैसे कधी येणार? सप्टेंबरमध्ये अर्ज भरल्यावर किती पैसे मिळणार? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे!

लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता भरता येईल का?

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार १५ ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, विविध तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांमधील घोळामुळे ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. परंतु, ३१ ऑगस्टपर्यंत देखील अनेक महिलांनी अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे ही मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर अजूनही अर्ज करू शकता.

हे ही वाचा >> Raj Thackeray : मनसेची बैठक सोडून राज ठाकरेंनी अचानक मुख्यमंत्री शिंदेंची भेट का घेतली? नेमकी काय चर्चा झाली?

या योजनेसाठी जॉइंट अकाऊंट चालेल का?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा, त्यांच्या सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी स्वतःकरता करावा त्यामुळे या योजनेसाठी वैयक्तिक स्वतंत्र खात्याचा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेसाठी जॉइंट अकाऊंटधारक महिला पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे तुमचं स्वतंत्र बँक खातं नसेल तर तुम्ही नजिकच्या कोणत्याही बँकेत जाऊन नवं खातं उघडू शकता.

हे ही वाचा >> Dhangar Reservation : “धनगर आरक्षणाची अधिसूचना काढली तर…”, अजित पवार गट आक्रमक; समाजात तेढ निर्माण न करण्याचा सरकारला इशारा

आता अर्ज केला तर एकत्रित तीन हप्ते मिळणार की एकच हप्ता मिळणार?

ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेल्या पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे मिळाले होते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना तीन महिन्याचे पैसे एकत्रितपणे मिळू शकतात. मात्र सरकारने तशी अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच याबाबत समाजमाध्यमांवर व्हायरल होणाऱ्या मेसेजेसवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मंत्रि आदिती तटकरे यांनी केलं आहे.