सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रद्द; आरबीआयने दिले ‘हे’ कारण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आज सोलापुरातील लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे.

Lakshmi Cooperative Bank
फोटो सौजन्य – सोशल मीडिया

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आज सोलापुरातील लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. बॅंकेकडे पुरेसे भांडवल नसून बॅंकेकडून नियांचे पालन होत नसल्याचे कारण आरबीआयकडून देण्यात आले आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी! ‘वेदान्त-फॉक्सकॉन’नंतर PhonePe चा राज्य सोडण्याचा निर्णय; मुंबईतून कर्नाटकात हलवलं कार्यालय

आरबीआयने एक निवेदन जारी करत म्हटले, “सोलापूर येथील लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला आर्थिक व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, 1949 च्या कलम ५६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने सहकार आयुक्त आणि सहकारी संस्था निबंधक यांना बँक बंद करण्याचा आदेश दिले आहेत. तसेच बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्यासही सांगितले आहे.

हेही वाचा – “नारायण राणेंनी सुपारी घेतली का?” ‘गुंड’ म्हणत किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल; नरेंद्र मोदींचेही घेतले नाव; म्हणाल्या…

बँकेकडे पुरेसे भांडवल नसून ठेवीदारांचे पैसे परत करण्यास बॅंक सक्षम नाही. सध्या बॅंकेची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. बँकेला आर्थिक व्यवहार सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यास, ठेवीदारांचे नुकसान होईल, असे आरबीआय कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-09-2022 at 22:25 IST
Next Story
“धाड टाकणाऱ्या यंत्रणांनी आगामी २४ तासात…”, देशभरातील छापेमारीवर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया
Exit mobile version