लोकसत्ता प्रतिनिधी

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस असलेले खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांच्या वारसांना जमीन महसूल करात यापूर्वी देण्यात आलेली सूट तहहयात सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला सांगितलं तर व्हाल का? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पक्ष जे सांगेल…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Uddhav Thackeray Launch Vachanan Nama
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा जाहीर, छत्रपती शिवरायांचं मंदिर, मोफत शिक्षण आणि काय काय वचनं?
Baba Siddique Shot dead
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणः आणखी एका आरोपीला अटक
gold silver rate today, Gold Silver Price 11 january 2025
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरातील वाढ सुरूच, आज २२, २४ कॅरेट सोन्याचा दर काय? जाणून घ्या

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे राज्याच्या इतिहासातील अनन्यसाधारण महत्त्व विचारात घेऊन भोसले कुटुंबीयांची उपजीविका त्यांच्या दर्जानुसार होण्यासाठी घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्तांना शासनाने १९५३ पासून महसुलात सूट दिलेली आहे. ही सवलत सध्याही सुरू असून, ती खासदार उदयनराजे भोसले यांच्या हयातीनंतर वंशपरंपरेने त्यांच्या रक्ताच्या वारसांना तहहयात सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

आणखी वाचा-Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने काढलेल्या या शासन निर्णयात म्हटले आहे, की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे महत्त्व लक्षात घेऊन घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्तासंदर्भात वेळोवेळी शासन आदेश काढून सूट दिलेली आहे.

१९५३ मध्ये याबाबत प्रथम निर्णय घेण्यात आला होता. राज्य शासनाच्या वतीने कॅप्टन श्रीमंत शाहू प्रतापसिंह भोसले यांना अशी सूट दिली होती. त्यांच्या निधनानंतर मुलगा श्रीमंत प्रतापसिंह महाराज शाहू महाराज भोसले यांना १९५७ च्या शासन निर्णयानुसार सूट देण्यात आली. त्यानंतर १९८० च्या शासन निर्णयानुसार ही सूट उदयनराजे भोसले यांना दिली होती. आता ९ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार खासदार उदयनराजे भोसले यांच्या हयातीनंतर वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना तहहयात सूट सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Story img Loader