दरड कोसळल्याने माळशेज घाटातील वाहतूक दोन दिवस बंद

घाटातील वाहतूक बंद झाल्यामुळे नगर-कल्याण मार्गावरील वाहतुकीवर परिणाम

malshej ghat
माळशेज घाटातील गणेश मंदिराजवळील भागात सोमवारी सकाळी दरड कोसळली

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात दरड कोसळली असून, त्यामुळे या घाटातील वाहतूक दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. घाटातील वाहतूक बंद झाल्यामुळे नगर-कल्याण मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
माळशेज घाटातील गणेश मंदिराजवळील भागात सोमवारी सकाळी दरड कोसळली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरड कोसळल्यामुळे संपूर्ण महामार्गावर मोठ मोठे दगड पडले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक थांबविण्यात आली. जेसीबीच्या साह्याने दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Landslide at malshej ghat