scorecardresearch

Premium

सातारा: वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात दरड कोसळली

पाचगणी महाबळेश्वरकडे  जाणारी येणारी वाहतूक ठप्प झाली.पसरणी घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या

landslide on wai panchgani road
पसरणी घाटात दरड कोसळली

विश्वास पवार

वाई:वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात बुधवारी दुपारी दरड कोसळली. यामुळे पाचगणी महाबळेश्वरकडे  जाणारी येणारी वाहतूक ठप्प झाली.पसरणी घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दरड हटविण्याचे काम सुरू केले . सायंकाळ पर्यंत दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येईल असे उप अभियंता महेश गोंजारी यांनी सांगितले.घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाई पोलीस दाखल झाले होते.

arrested
वाघाचे कातडे विकणाऱ्या महाबळेश्वरच्या तिघांना अटक; मुंबईत पोलिसांची कारवाई, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
onion
उद्यापासून पुन्हा कांदा कोंडी? केंद्राच्या धोरणास विरोध, लिलावापासून दूर राहण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय
heavy traffic congestion on mumbai goa highway
मुंबई गोवा महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी; गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकर मान्यांचे प्रचंड हाल
school students block road for bus
बस नसल्याने आक्रमक विद्यार्थिंनींचा रस्त्यावरच ठिय्या

हेही वाचा >>> सांगली: पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून पतीची आत्महत्या

वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात बुधवारी दुपारी दत्त मंदिराच्या पुढे वाईहुन पाचगणीला जाण्याच्या मार्गावर रस्त्यावर भली मोठी दरड कोसळली.यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली.पाचगणी व वाई कडे जाणाऱ्या वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या.मागील काही दिवसांपासून परिसरात हलका व मध्यम पाऊस सुरु आहे.सकाळ पासून जिल्ह्यात पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली आहे. दुपार नंतर पावसाने विश्रांती घेतली . सतत पडणाऱ्या पावसामुळे डोंगरावरील माती सैल झाल्याने छोटे मोठे दगड आणि माती निसरडे झाले आहेत.त्यातून या मार्गावर दरड कोसळली. मोठ्या प्रमाणात दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती.एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. संबंधित विभागाच्या वतीने दरड हटवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.सायंकाळ पर्यंत दरड हटविण्यात आली. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. दरवर्षी वाई पाचगणी महाबळेश्वर येथे मुसळधार पाऊस पडत असतो.मुसळधार पावसात दरडी  कोसळतात.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई येथील आयआयटीच्या अभियंत्यांकडून दरड कोसळू नये यासाठी उपाययोजना सुचविण्यास सांगितले आहे. दि १६ सप्टेंबर रोजी या अभियंत्यांकडून पाहणी करण्यात आली आहे.त्याबाबतचा अहवाल लवकरच प्राप्त होईल व पुढील कार्यवाही सुरु होईल असे उपअभियंता महेश गोजारी यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Landslide from prasrani ghat on wai panchgani road zws

First published on: 27-09-2023 at 18:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×